‘प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटायचं की मी एक पाऊलही पुढे टाकू शकणार नाही, तेव्हा कोणीतरी माझ्या बाजूने चालायला यायचं. आता मागे वळून पाहताना मला कळतंय की, तो योगायोग नव्हता. ती देवानेच केलेली मदत होती. या प्रवासात मला जाणवलं की, देव नेहमीच आपल्यासमोर दिव्य स्वरुपात प्रकट होत नाही. तो माझ्या आयुष्यात माझे गुरू, माझे डॉक्टर, नर्स, कुटुंब, मित्र आणि अगदी अनोळखी असलेल्या पण नंतर आशीर्वाद बनलेल्या व्यक्तीच्या रुपात आला. मला माझ्या गुरुंनीच शिकवलंय की शरणागती म्हणजे पराभव नाही, ती श्रद्धेची सर्वोच्च पातळी असते. त्यामुळे शरणापती पत्करल्यावर ‘माझ्यासोबतच असं का?’ हा प्रश्न मी विचारणं सोडून दिलं आणि प्रत्येक आव्हानामागे एक उद्देश असतो, यावर विश्वास ठेवला,’ असं मेधा मांजरेकर यांनी लिहिलं.