Sara Tendulkar On Arjun Tednulkar: अर्जुन तेंडुलकरने लखनौसाठी काल पदार्पण केले आणि विकेटही काढली. अर्जुनने विकेट काढल्यानंतर तेंडुलकर कुटुंबात आनंद पसरला आहे.

आपल्या भावाच्या खास दिवशी, सारा तेंडुलकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर अर्जुनचा मैदानावर आनंद साजरा करतानाचा एक फोटो पोस्ट केला. तिने त्याला कॅप्शन दिले, “माझ्या लहान भावा, तू संपूर्ण जगास पात्र आहेस. तुझी मेहनत, दबाव हाताळण्याची तुझी क्षमता आणि या संपूर्ण प्रवासातील तुझा संयम यांचा मला खूप अभिमान आहे. तुझ्यावर माझे प्रेम कायम राहील आणि त्याहूनही अधिक राहील.” साराची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये, साराने अर्जुन काही काळापासून करत असलेला संघर्ष आणि दीर्घ प्रतीक्षा व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण संधींची वाट पाहणे आणि प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहणे सोपे नसते. अर्जुनसाठी केलेल्या पोस्टखाली अर्जुनची बायको सानिया चंदोकनेही आपले प्रेम व्यक्त केले.
MI vs RR: बुमराहला संपूर्ण हंगामात दुखापत होती तरीही खेळवलं म्हणून परफॉर्मन्स खराब झाला? राजस्थानविरुद्ध मॅचपूर्वी कोच जयवर्धनेकडून मोठा खुलासा
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने दमदार सुरुवात केली. कर्णधार ऋषभ पंतने पॉवरप्लेनंतर लगेचच त्याच्यावर जबाबदारी सोपवली. मात्र, सामन्यादरम्यान कर्णधार पंतने अर्जुनच्या गोलंदाजीवर एक झेल सोडला आणि त्याची पहिली विकेट थोडक्यात हुकली. नंतर त्याने शानदार पुनरागमन केले आणि पंजाब किंग्सविरुद्ध आपल्या चार षटकांत 36 धावा देत एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. यापूर्वी, तो संघासाठी शेवटच्या षटकात नाबाद राहिला होता आणि त्याने 5 धावा केल्या होत्या.
शाब्बास, अर्जुन. या संपूर्ण हंगामात तू ज्या प्रकारे स्वतःला सांभाळले आहेस, त्याचा मला अभिमान आहे. तू नेहमी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवलास, संयम राखलास, शांतपणे कठोर परिश्रम केलेस आणि अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत संधीची वाट पाहूनही सकारात्मक राहिलास. क्रिकेट कौशल्याइतकीच संयमाचीही परीक्षा घेते आणि आज तू या दोन्ही गोष्टी उत्कृष्टपणे दाखवल्यास. जमिनीवर पाय ठेव आणि नेहमीप्रमाणेच खेळावर प्रेम करत राहा. माझे तुझ्यावरचे प्रेम कायम राहील.”
