US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर


Middle East Conflict न्यूयॉर्क: अमेरिका आणि इराण यांच्यातील करारासंदर्भातील चर्चेच्या फेऱ्या सुरुच आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात करार झालेला नाही. अमेरिका आणि इराण संघर्षाचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचं चित्र दिसत नाही. अमेरिका इराण विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका इराणवर मोठी कारवाई करण्याचे संकेत देत आहे. कारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामध्ये इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा दिसून येत आहे. या फोटोनं जगभर खळबळ उडाली आहे.    

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतंही भाषण पोस्ट न करता ही पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमधील इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा असून त्यावर यूनायटेड स्टेटस ऑफ मिडल ईस्ट असं लिहिलं आहे. 
 
नव्या अपडेटनुसार इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर इराणच्या दौऱ्यावर आहेत. इराणच्या मीडियाच्या रिपोर्टनुसार मुनीर यांनी राष्ट्रपती मसूद पेजेशकियान, विदेश मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गालिबफ  यांच्याशी स्वतंत्रपणे भेट घेतली. 

ट्रम्प इराणवर हल्ला करणार? 

अमेरिकन मीडियाकडून डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्यासंदर्भात गांभीर्यानं विचार करत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यात करार झाला नाही तर   अमेरिका इराणवर मोठा हल्ला करु शकते.  

इराणची अमेरिकेला धमकी 

इराण आणि अमेरिका यांच्या शा‍ब्दिक वार प्रतिवार पाहायला मिळत आहे. फिनलँडमधील इराणच्या उच्चायुक्त कार्यालयानं एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना एकदा वाटतं व्हेनेझुएला अमेरिकेचं 51 वं राज्य आहे, दुसऱ्या दिवशी वाटतं ग्रीनलँड अमेरिकेचं 52 वं राज्य बनेल, अशी खिल्ली इराणनं अमेरिकेची उडवली. इराणच्या उच्चायुक्तानं  पुढं म्हटलं 51 वं आणि 52 वं राज्य बनवण्याचं स्वप्न आभासी किल्ल्यांप्रमाणं असून त्या प्रयत्ना कदाचित अमेरिकेची 50 राज्य त्यांच्या हातून निघून जातील.  

हेदेखील वाचा

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *