Rakhi Sawant On Mika Singh: ‘मला किस करायचंच हे तो ठरवून आलेला’; मिका सिंगच्या पार्टीतील ‘त्या’ घटनेबाबत राखी सावंतचा नवा गौप्यस्फोट


Rakhi Sawant on Mika Singh Kiss Controversy: नुकतीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात झळकलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कायम आपल्या वादग्रस्त, बोल्ड  विधानांमुळे चर्चेत असते.अलीकडेच ‘हॉटर फ्लायर’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या वयक्तिक आयुष्यातील चढउतरांविषयी सांगितले. तिच्या लग्नाच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. घरगुती हिंसाचाराला तिला समोरं जावं लागल्याचं सांगत इंडस्ट्रीतील बरे वाईट अनुभवही तिने सांगितले. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या एका वादग्रस्त प्रकरणावरही ती बोललीय.

लोकप्रिय गायक मिका सिंगसोबत किसिंग प्रकरणावर राखी बोलली आहे . मिकाने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत राखीला जबरदस्ती किस केलेलं. त्यानंतर राखीने त्याच्याविरोधात केस दाखल केली होती.2006 मध्ये झालेल्या या प्रकारावर ती बोललीय.

राखीचा मिकासोबतच्या वादावर खुलासा 

राखी सावंतने मिका सिंगसोबत झालेल्या या वादावर खुलासा करत सांगितले,” मिकाने मला पार्टीत  जबरदस्ती किस केलं होतं. मला किस करायचं हे त्याने ठरवलंच होतं.  त्यावेळी माझे वडील म्हणाले होते, मी तुला सांगत होतो बॉलीवूडमध्ये जाऊ नकोस’. तेंव्हा मी वडिलांना सांगितलेलं की यात माझी काहीच चूक नव्हती. त्याने मला जबरदस्ती किस केलं होतं. मी तर काहीच केलं नव्हतं. ते माझ्या आईलाही बोलले होते की, बघ..मुलीला बॉलीवूडमध्ये पाठवलंस पण काय झालं. त्यांना हे नाही दिसलं की त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. मी केसही केली होती. 15- 20 वर्ष केस सुरु होती. पण आता मी त्याला माफ केलं आहे. आता मी लोकांना माफ करून टाकते”

 

 

View this post on Instagram

 

त्या पार्टीत नेमकं काय झालेलं?

पार्टीत नेमकं काय झालं होतं हेही राखीने सांगितलं. ती म्हणाली ‘ काही नाही, नॉर्मल पार्टी सुरु होती. जसं सगळे हाय हेलो करतात, टे सुरु होतं. तो केक कापून माझ्याजवळ आला, आणि त्याने मला किस केलं. राखीला किस करायचं हे त्याने आधीच ठरवलं होतं.सुनिधी चौहान, मीट ब्रदर्स, शेफाली जरीवाला यांनी मला नंतर सांगितलं की त्याने हे प्लॅन केलं होतं.  

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *