चीनमध्ये धरण फुटलं, पुराच्या पाण्यात वाहून गेलं साप पालन केंद्र, कोब्रासह 900 हून अधिक साप मोकळे, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण


China Flood News : चीनमध्ये ‘मायसाक’ हे वादळ आलं आहे. या उष्णकटिबंधीय वादळामुळे भीषण पूर आला आहे. या चक्रीवादळामुळं 39 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सर्वात भीषण घटना गुआंगशी प्रांतातील नानिंग शहरात घडली आहे, जिथे धरण कोसळल्याने 26 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच या भीषण पुराच्या तडाख्यात हेंगझोऊ शहरातील डेंगवेई गावात असलेले एक मोठे स्नेक ब्रीडिंग फार्म (साप पालन केंद्र) पूर्णपणे वाहून गेले आहे. या दुर्घटनेनंतर फार्ममधून घातक कोब्रासह सुमारे 900 साप अचानक पुराच्या पाण्यात मोकळे फिरु लागलेत. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. 

चीनच्या गुआंगशी प्रांतात आलेल्या ‘मायसाक’ या विनाशकारी वादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक धरणे फुटली आहेत. या भीषण पुराच्या तडाख्यात हेंगझोऊ शहरातील डेंगवेई गावात असलेले एक मोठे स्नेक ब्रीडिंग फार्म (साप पालन केंद्र) पूर्णपणे वाहून गेले. या दुर्घटनेनंतर फार्ममधून घातक कोब्रासह सुमारे 900 साप अचानक पुराच्या पाण्यात मोकळे फिरू लागले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून डेंगवेई गावात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने बचाव पथके तैनात केली असून, गावकऱ्यांना पुराच्या पाण्यापासून दूर राहण्याचा आणि घरामध्येच सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे अनेक नद्यांना पूर

दक्षिण चीन समुद्रात तयार झालेले उष्णकटिबंधीय वादळ मेसॅक, हैनान बेटावरून जात दक्षिण चीनच्या दिशेने सरकले. त्यासोबत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ग्वांग्शी आणि आसपासच्या परिसरात पूर आला. अनेक नद्यांना पूर आला आणि काही ठिकाणी धरणे फुटली, परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. पूर आणि धरणफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि आपत्ती निवारण संस्थांनी बाधित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अनेक भाग अजूनही पाण्याखाली असल्याने मदतकार्यात अडथळा येत आहे. प्रशासन बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आणि आवश्यक मदत पुरवण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.

चीनच्या हवामान विभागाने इशारा दिला आहे की, ‘मायसाक’ या उष्णकटिबंधीय वादळाच्या प्रभावामुळे पुढील काही दिवसांत दक्षिण चीनच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी सखल भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचे, सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. याव्यतिरिक्त, भूस्खलन आणि अचानक येणाऱ्या पुराच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *