या गाण्यातील शब्द मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतानाच आई-वडिलांच्या मनातील प्रेम, काळजी आणि विरह व्यक्त करतात. म्हणूनच अनेक दशकांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. पिढ्या बदलल्या, विवाहसोहळ्यांचा थाट बदलला, आधुनिक गाण्यांचा ट्रेंड आला, तरी विदाईच्या प्रसंगी या गाण्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही.