Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींचे खर्च वाढणार, पैसा जपून वापरा! जुलैच्या नव्या आठवड्यात नवी संधी भेटण्याची शक्यता; साप्ताहिक राशीभविष्य


Weekly Horoscope 13 To 19 July 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा नवा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा तिसरा तसेच नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधल्याने अनेक गैरसमज दूर होतील. अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी छोट्या गोष्टींवरून वाद टाळावेत.

करिअर (Career) – कामाच्या बाबतीत या आठवड्यात नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत. वरिष्ठ तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. कार्यालयीन राजकारणापासून दूर राहिल्यास अधिक फायदा होईल. व्यवसायात मार्केटिंग आणि विस्तारासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष यशदायी राहील.

आर्थिक स्थिती (Wealth) – अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग खुलतील. फ्रीलान्स किंवा साईड इनकममधून लाभ मिळू शकतो. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

आरोग्य (Health) – आरोग्याच्या बाबतीत नवीन आठवड्यात मानसिक तणाव कमी होईल. नियमित योग, प्राणायाम आणि संतुलित आहारामुळे ऊर्जा वाढेल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, भावनिक स्वभावामुळे छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. जोडीदारासोबत प्रामाणिक संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. अविवाहितांना घाईघाईत निर्णय घेणे टाळावे.

करिअर (Career) – वृषभ राशीच्या लोकांचा कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल, मात्र तुमची मेहनत वरिष्ठांच्या नजरेत भर पडेल. नवीन जबाबदारी स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. व्यवसायात मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.

आर्थिक स्थिती (Wealth) – खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील आवश्यक वस्तूंवर किंवा आरोग्यावर खर्च होऊ शकतो. आर्थिक नियोजन केल्यास अडचणी टाळता येतील. मोठी गुंतवणूक काही दिवस पुढे ढकलणे योग्य ठरेल.

आरोग्य (Wealth) – तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर मानसिक ताण, झोपेची कमतरता किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. ध्यान, प्राणायाम आणि वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! जुलैचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *