Weekly Horoscope 13 To 19 July 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (July 2026) महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा 13 ते 19 जुलैपर्यंतचा असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर प्रभाव होणार आहे. कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे तर कोणाचं नुकसान होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तूळ ते मीन या 6 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. वैयक्तिक जीवनात तुम्ही फार खुश असाल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. नवीन प्रोजेक्ट्सवर काम करता येईल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी 13 ते 19 जुलैचा कालावधी सकारात्मक आणि परिवर्तनाचा असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आर्थिक स्थितीत चांगले बदल झालेले दिसतील. फक्त पैसे खर्च करताना सावधानता बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी जुलैचा दुसरा आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला ना लाभ ना तोटा होणार आहे. तसेच, तुमच्या कामाच्या बाबतीत कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा करु नका. तुमच्या भावना इतरांशी शेअर करु नका. सरकारी योजनांचा लाभ घ्याल. तसेच, धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आर्थिक स्थिरतेचा असणार आहे. या काळात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तसेच, नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही फार उत्सुक असाल. तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल मात्र, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. मात्र, त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यासाठीच तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी जुलैचा दुसरा आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट झालेली दिसेल. तुमच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील. मित्राचं सहकार्य तुम्हाला चांगलं लाभेल. तसेच, तुमचा सकारात्मक दृष्टीकोन राहील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप