Jalgaon News: दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात एका तरुणाने स्टंटबाजी केली. कंबरेला पिस्तूल दाखवत पैशांची उधळण करत त्याने उपस्थितांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव शहरात दिवाळीनिमित्ताने काही संस्थांकडून दिवाली सुफी नाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये एक व्यक्ती पांढराशुभ्र ड्रेस घालून हातात पैशांचे बंडल घेत कंबरेला पिस्तूल लावून उपस्थित मंडळींवर पैशांची उधळण करीत होता. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि जळगाव पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन संबंधित तरुण पियुष मणियार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरात काही न्यूज पोर्टलतर्फे दिवाळीच्या एक दिवस आधी दिवाळी सुफी नाईट या शोचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन जळगाव मुख्यालयाच्या पद्मालय सभागृहात भरवण्यात आले होते. अर्थात पोलिसांच्या डोळ्यासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक कव्वाली सुरू होती. या गाण्यावर जळगाव शहरातील पियुष मणियार हा तरुण हातात कोऱ्या कट नोटांचा बंडल, पांढरा शुभ्र ड्रेस आणि स्वरक्षणासाठी देण्यात आलेल्या पिस्तुलाची सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण होईल या पद्धतीने वापरत होता. हे पाहून पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य: ‘शहरी नक्षलवाद हे नव्या युगातील सर्वात मोठं आव्हान, तर काँग्रेस अल्ट्रा लेफ्टिस्ट विचारांनी ग्रस्त’ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिवाळी सुफी नाईट या कार्यक्रमासंदर्भातला हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ त्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पाठवला. त्यानंतर काही मिनिटातच या पियुष मणियारवर जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खरंतर हा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी पोलीस यांच्यासमोर हा कार्यक्रम सुरु होता. यात पियुष मणियार हा पांढरे शुभ्र कपडे परिधान करून नोटांची उधळण करीत होता आणि गाण्यावर नाचत होता. मात्र, त्याच्या कंबरेला पोलिसांनी अधिकृत संरक्षणासाठी दिलेल्या पिस्तुलाचे प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करत होता. अर्थात परवाना देताना त्या त्याबद्दलचे नियम माहित असतानादेखील मोठ्या रुबाबात तो प्रदर्शन करत असल्याने त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
GR रद्द, पण ठाकरे बंधू एकत्र येणारच, सेना-मनसे कार्यकर्त्यांना काय वाटतं?
पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या फिर्यादीवरून पियुषवर जिल्हा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम, 1959 कलम 30 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा