Chanakya Niti : एकदा चंद्रगुप्तने आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांना प्रश्न केला की, ‘गुरुदेव, मी रणांगणावर माझ्या शत्रूंना पराभूत करू शकतो. पण तुमच्या रागाला नाही. माझं मन क्षुल्लक कारणावरुन संतप्त होते. त्या वेळी मी विसरून जातो की काय करतोय आणि माझ्यासमोर कोण आहे. नंतर राग शांत होतो. पण, त्यानंतर मला माझ्या शब्दांचा, वागण्याचा पश्चाताप होतो. मात्र, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.’ यावर आचार्य चाणक्य उत्तर देत म्हणतात, ‘चंद्रगुप्त, राग हा असा अग्नी आहे जो सर्वात आधी स्वत:ला जाळतो.
आचार्य चाणाक्य यांच्या मतानुसार, जर तुम्ही या गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता.
1. सर्वात आधी स्वत:ला शांत करा.
राग आल्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. दीर्घ श्वास घ्या, काही वेळ शांत राहा आणि परिस्थितीपासून थोडं अंतर ठेवा.
2. शब्दांवर नियंत्रण ठेवा.
रागाच्या भरात बोलले गेलेले शब्द परत घेता येत नाहीत. यासाठी बोलायच्या आधी 10 वेळा विचार करा की, हे योग्य आहे का.
3. व्यक्ती नाही, समस्यांवर लक्ष द्या.
प्रत्येक प्रक्रियेच्या मागे एक कारण असते. व्यक्तीला नाही, त्याचे वागणे समजून घ्या.
4 . रागाचे ऊर्जेत रुपांतर करा.
रागाला प्रेरणेत बदला. त्याऐवजी कठोर परिश्रम, ध्येय आणि यश प्रस्थापित करा.
5. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या
रागात घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरु शकतो. त्यामुळे राग शांत झाल्यावरच निर्णय घ्या.
रागाचे दुष्परिणाम
मानसिक अस्वस्थता आणि तणाव
नात्यांमधील दुरावा
आरोग्य समस्या
चुकीचे निर्णय
अंतिम धडा
चाणक्य नीतिनुसार, “जो व्यक्ती आपल्या क्रोधावर विजय मिळवतो, तो स्वतःच्या नशीबाचा मालक बनतो. क्रोध तुमचा गुलाम असावा, तुम्ही त्याचे गुलाम नसावे.”
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Guru Aditya Rajyog 2026 : गुरु-आदित्य राजयोगाने ‘या’ राशींचं उजळणार भाग्य; 16 जुलैपासून मागाल ती इच्छा होईल पूर्ण, धनसंपत्तीत मिळणार लाभ