Pune: पाण्यात उतरून अमनने सगळ्यांना वाचवलं, पण एका फांदीने घेतला जीव, मन विचलित करणारा VIDEO | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

लोकांना मदत करत असताना अमन मुजावर याचे निधन झाल्याने शासनाने त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

News18
News18

खोपोली : राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. ठिकठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडतं आहे. अशातच मुंबई पुणे जुन्या हायवेवर खंडाळा घाटात महामार्गावर झाड पडले असताना त्या झाडाची फांदी लागून खोपोलीतील या तरुणाचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.

गेले पाच दिवस मुसळधार पावसाने कहर केला असता परवा मुंबई पुणे जुन्या हायवेवर खंडाळा घाटात महामार्गावर झाड पडले असताना त्या झाडाची फांदी लागून खोपोलीतील या तरुणाचा आज दुर्दैवी मृत्यू झाला.अत्यंत शोकाकुल वातावरणात आज रात्री अकरा वाजता खोपोलीच्या दफनभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी मृत्यू मुळे खोपोलीत शोककळा पसरली आहे.

खंडाळा घाटात झाड पडल्याची खबर खोपोलीतील अमन मुजावर (वय 25)आणि त्याच्या मित्रांना मिळाली. त्यानंतर अमन आणि त्याचे मित्र हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हे झाड महामार्गावरून हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. झाडाच्या फांद्या बाजूला केल्या. पण एका फांदीला बांधलेला दोर बांधून तो टेम्पोच्या मदतीने पुढे घेऊन चालले होते. पण अचानक दोर तुटला आणि जी फांदी जोरदार वेगात येऊन अमनच्या पोटाला लागली. त्यावेळी अमन तिथेच उभा होता. ही फांदी ही अमनच्या पोटात लागली त्यामुळे तो खाली बसला. सुरूवातील तो गंमत करतोय, असं त्याच्या मित्रांना वाटलं. पण, अमनची तब्येत आणखी बिघडली.

मित्रांनी लगेच अमनला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, मंगळवारी संध्याकाळी त्याचं निधन झालं. लोकांना मदत करत असताना अमन मुजावर याचे निधन झाल्याने शासनाने त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/पुणे/

Pune: पाण्यात उतरून अमनने सगळ्यांना वाचवलं, पण एका फांदीने घेतला जीव, मन विचलित करणारा VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *