ठाकरेंचे 15 आमदार जाणार, तारीखही जाहीर, हिंदुस्थानी भाऊच्या दाव्याने खळबळ, थेट सप्टेंबरच्या.. – Marathi News | Hindustani Bhau shared video claiming that 15 MLA from the Uddhav Thackeray faction are set to break away


शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर सचिन आहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडली. सचिन आहिर यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज केला. त्यावेळी सचिन आहिर थेट शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे स्पष्ट झाले. मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांना होता. सचिन आहिर हे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू होते. अजूनही काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते मोठी बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलवली. या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील अनुपस्थित होते. त्यांच्या घरी कार्यक्रम असल्याने ते बैठकीला हजर राहिले नसल्याचे सांगितले जाते.

यादरम्यानच सप्टेंबरच्या 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आमदार मोठी बंडखोरी करणार असल्याचा दावा करण्यात आला. रिलस्टार हिंदुस्थानी भाऊ याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओ मोठा दावा केला जात आहे. यादरम्यान त्याने संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. हिंदुस्थानी भाऊ व्हिडीओमध्ये म्हणाला की, उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, माहितीय ना? मी मध्ये बोललेलो होतो ना..

सांभाळा नाही तर पंधरा आमदार आणि 25 नगरसेवक जायच्या मागे आहेत. सचिन आहिर यांनी पहिला बॉम्ब फोडला. सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबरची 7 तारीख लक्षात ठेवा.. खूप काही जाणार आहे.. हेच नाही तर या व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊकडून थेट संजय राऊत यांचा उल्लेख भांडुपचा खोटा अनिल कपूर म्हणून करण्यात आला.

तुमचा अनिल कपूर काय बोलतो आहे? तुडवा ऑपरेशन चालू करणार.. अरे सचिन आहिर कोण आहे? दगडी चाळीचे नाव ऐकले आहे का? सात रस्ता, दगडी चाळ… अरूण गवळी ऊर्फ डॅडी… बाळासाहेब काय बोलायचे… तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे… सप्टेंबरच्या 7 तारखेला मोठे तब्बल 15 आमदार जाणार असल्याचे मोठे विधान हिंदुस्थानी भाऊने केले.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *