चर्चगेट ते वसई रोड दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू मात्र लोकल उशिराने
वसई-विरार विभागात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडत असून, काल ३ ते ४ तासांत २३० ते २५० मिमी अतिवृष्टी झाल्याने काही ठिकाणी पाणी साचले.
सध्या चर्चगेट ते वसई रोड दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.
वसई रोड आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.
दोन्ही स्थानकांवरील पाणी हळूहळू ओसरत असून, पाणी उपसण्यासाठी पंप कार्यरत आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
आज सायंकाळी ५:१७ वाजता ३.७७ मीटरची भरती अपेक्षित आहे.
दरम्यान, या विभागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, परिस्थितीवर पश्चिम रेल्वेचे बारकाईने निरीक्षण सुरू आहे.