Sharad Pawar Camp and BJP: भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या मुंबईतील गुप्त भेटीनंतर शरद पवार गट महायुतीसोबत सत्तेत सामील होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता सपशेल फेटाळून लावली आहे. देवेंद्र फडणवीस मंगळवारी एका बैठकीसाठी दिल्लीत गेले होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील कोणताही नवीन पक्ष एनडीएमध्ये येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची मुंबईतील भेट निष्फळ ठरली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्रातून NDA मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष NDA मध्ये राहतील. कुठलाही नवीन पक्ष आता एनडीएमध्ये येण्याची आमची चर्चा नाही”, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. “आम्ही शरद पवारांच्या सोबतच्या कुणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, शरद पवार यांच्या पक्षात जे आमदार आणि खासदार आहेत, त्यापैकी कुणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही”, असेही फडणवीसांनी सांगितले.
Vinod Tawde and Jayant Patil: विनोद तावडे आणि जयंत पाटलांच्या भेटीत काय चर्चा झाली?
सूत्रांच्या माहितीनुसार, विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकतं? याबाबत चर्चा झाल्याचे समजते. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वरिष्ठ नेता यांच्यातदेखील बैठक पार पडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय? असणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती ‘एबीपी माझा’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली. जयंत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याच मान्य केले. मात्र, बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.
NCP Sharad Pawar Camp: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या आमदारांची सविस्तर यादी
जितेंद्र आव्हाड (मुंब्रा-कळवा)
जयंत पाटील (इस्लामपूर)
रोहित पवार (कर्जत-जामखेड)
रोहित पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ)
संदीप रवींद्र क्षीरसागर (बीड)
नारायण गोविंदराव पाटील (करमाळा)अभिजीत पाटील (माढा)
खरे राजू ज्ञानू (मोहोळ)
उत्तमराव शिवदास जानकर (माळशिरस)
बापूसाहेब तुकाराम पाठारे (वडगाव शेरी)
NCP MP List: शरद पवार गटाचे लोकसभा खासदार
१. सुप्रिया सुळे – बारामती
२. अमर शरदराव काळे – वर्धा
३. भास्कर भगरे – दिंडोरी
४. सुरेश म्हात्रे – भिवंडी
५. निलेश ज्ञानदेव लंके – अहमदनगर
६. डॉ. अमोल कोल्हे – शिरूर
७. धैर्यशील मोहिते-पाटील – माढा
८. बजरंग सोनवणे – बीड
आणखी वाचा