Sameer Khandekar on Daughter Marathi School: मराठी अभिनेता समीर खांडेकरने (Sameer Khandekar) दादर येथे ‘पिठी भात’ (Pithi Bhaat) नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं. स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यापासून अभिनेता चर्चेत आहे. ‘पिठी भात’ या रेस्टॉरंटमध्ये खास मालवणी शाकाहारी पदार्थ मिळतात. त्यानं एका मुलाखतीत रेस्टॉरंट सुरु करण्यामागचा किस्सा सांगितला. तसेच मुलीला मराठी शाळेत घालण्यामागचं कारणही सांगितलं. बोरिवली, गोरेगाव मग दादरपर्यंत हा प्रवास कसा पोहोचला, याबद्दलचाही किस्सा अभिनेत्याने मुलाखतीत शेअर केला. ‘पिठी भात’ हा रेस्टॉरंट सुरू करण्यामागचा नेमका किस्सा काय? पाहूयात.
मराठी अभिनेत्याने लेकीसाठी मराठी शाळेची निवड केली (Sameer Khandekar on Daughter marathi school)
अलिकडेच समिर खांडेकर याने राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत समीर म्हणाला, ‘मी मूळचा अलिबागचा पण लग्नानंतर मी बोरिवलीत राहायला आलो. माझं घर छान होतं. पण वांद्रेच्या इथे आलो की, माझ्या डोळ्यात पाणी यायचं कारण, गावाकडच्या आठवणी ताज्या व्हायच्या. हळूहळू माझी मुलगी मोठी होत गेली. आम्हा दोघांचा एकच विचार. शाळेबाबतही आमचे विचार जुळले. आम्हा दोघांना मुलीला मराठी शाळेत घालायची होती. आम्ही गोरेगाव येथील शाळेत मुलीचं अॅडमिशन केलं. मग आम्ही बोरिवली सोडून गोरेगावमध्ये शिफ्ट होण्याचं ठरवलं’.
‘मग माझ्या डोक्यात एक विचार आला की, आपण बोरिवलीहून गोरेगावला जाऊ शकतो तर आणखी पुढे का नाही. मग माझ्या डोक्यात बालमोहन विद्यामंदिर शाळेचा विचार आला होता. मी यासंदर्भात मित्राला विचारलं. अॅडमिशन फुल्ल झाले आहेत, अशी माहिती मिळाली. मी शाळेतील सरांना भेटलो. मुलीसाठी मराठी शाळेत अॅडमिशन हवं आहे असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी फॉर्म भरला आणि अॅडमिशन झालं’, असं अभिनेता म्हणाला. ‘अॅडमिशनचं झाल्यानंतर मला माझी पत्नी, आता दादरना… असं म्हणाली’
‘आता लेकीचं अॅडमिशन तर झालं, शिफ्ट पण व्हावं लागेल. सुरुवातीला आम्ही भाड्याने राहिलो. मग माझं रेस्टॉरंटचं प्लॅनिंग सुरु झालं. आम्ही दादरमध्ये रेस्टॉरंटसाठी जागा शोधत होतो. सुरुवातीला आमचं स्वत:चं घर होतं पण दादरमध्ये आम्ही काही दिवस भाड्याने घर घेऊन राहिलो. पण दादरमध्येही आम्ही स्वत:चं घर घेतलं. नंतर गुजराती बंधू गोयल यांच्याकडून जागाही मिळाली. दादरमध्ये आज लेकीला मराठी शाळेत घातली. स्वत:चं घर आणि मराठमोळं रेस्टॉरंट उभं राहिलं. यात आई आणि पत्नीचा मोठा वाटा आहे’, असं समीरने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या: