Welcome to the jungle box office collection Day 10: ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) या सिनेमानंतर अक्षय कुमार स्टारर ‘वेल्कम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त या सिनेमात सुनील शेट्टी, दिशा पटानी, परेश रावल यांसह दिग्गज कलाकारांची (Entertainment) फौज पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची सध्या आलिया भट्टच्या ‘अल्फा’ सिनेमाची स्पर्धा असून, दुसऱ्या विकेंडलाही या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यात यश मिळवले आहे. ‘वेल्कम टू द जंगल’ या सिनेमाने दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
‘वेल्कम टू द जंगल’ या सिनेमाने 10 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Welcome to the jungle box office collection)
अहमद खान दिग्दर्शित ‘वेल्कम टू द जंगल’ या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कॉमेडी अॅडव्हॅन्चर सिनेमाने पहिल्या आठलवड्यात 93.15कोटींचे धमाकेदार कमाई केली आहे. नुकताच ‘अल्फा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाची स्पर्धा असूनही ‘वेल्कम टू द जंगल’ या सिनेमाच्या कमाईत घट झालेली नाही. दुसऱ्या रविवारीही या सिनेमाने चांगली कामगिरी केली आहे.
‘वेल्कम टू द जंगल’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. या कॉमेडी सिनेमानं पहिल्या आठवड्यात 93.15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करुन जबरदस्त कामगिरी केली. या सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 4.50कोटी कमावले. तर, नवव्या दिवशी या सिनेमाने 7.50कोटी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘वेल्कम टू द जंगल’ या सिनेमाने प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी 9.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
म्हणजेच या सिनेमाने एकूण 10 दिवसांत 114.90 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. अवघ्या 10 दिवसांत या सिनेमाने 110 कोटींचा आकडा पार केला. दरम्यान, हा सिनेमा या वर्षातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. ‘भूत बंगला’ या सिनेमाने 199.3 कोटी कमावले होते. हा सिनेमा लवकरच ‘भूत बंगला’ या सिनेमाच्या कलेक्शन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, हा सिनेमा या वर्षातील तिसरा सर्वात कमाई करणारा चित्रपट बनू शकतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या: