Niti Taylor On Violent Boyfriend: टीव्ही अभिनेत्री (TV Actress) निती टेलर (Niti Taylor) हिनं नुकतंच आपल्या एका टॉक्सिक रिलेशनशिपबाबत खुलासा केलाय. एका हिसंक आणि छळवणूक करणाऱ्या नात्यातून बाहेर पडणाबाबत मोकळेपणानं भाष्य केलंय. ‘प्राइम व्हिडीओ’वरील (Prime Video) ‘अलायन्स’ (Alliance) या रिअॅलिटी शोमधील चर्चेदरम्यान, तिनं खुलासा केलाय की, तिचा एक्स बॉयफ्रेंड हिंसक प्रवृत्तीचा होता. यावेळी तिनं एका घटनेचा उल्लेख केला, ज्यामध्ये त्यानं सिगारेटनं तिच्या मांडीला चटका दिलेला. या घटनेनंतर तिनं अखेर ते नातं संपवून त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
‘अलायन्स’ (Alliance Show) शोमध्ये मिनी माथूर, रुही दोसानी आणि देल्बार आर्या यांच्याशी बोलताना निती टेलर हिनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडून झालेल्या छळाच्या आठवणींबाबत सांगितलं. भर कार्यक्रमात आपल्या त्वचेवरील जखमेची खूण दाखवत निती म्हणाली की, “माझ्या एक्स बॉयफ्रेंडनं एकदा मला सिगारेटनं चटका दिलेला. तो हिंसक आणि विक्षिप्त स्वभावाचा होता. एका रात्री, त्याचा वाढदिवस होता, त्यावेळी त्याचा ताबा सुटला. तो दिवस अत्यंत भयानक होता. त्यानं मला थोबाडीत मारली आणि मी फक्त इतकंच म्हटलेलं की, “गुडबाय, नंतर भेटुयात… त्यावेळी मी खूपच लहान होते. जेव्हा तुम्ही एखाद्या नाजूक किंवा असुरक्षित परिस्थितीत असता, तेव्हा लोकांचं चारित्र्य नीटपणे ओळखता येत नाही. तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होता…”
पतीपासून वेगळी झालीय निती टेलर? (Is Niti Taylor Get Divorced)
निती टेलरनं 2020 मध्ये तिचा प्रियकर परीक्षित बावा याच्याशी लग्न केलं. पण, 2024 मध्ये ते दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या जोडप्यानं गेल्या दोन वर्षांत एकमेकांसोबतचे फोटो शेअर केलेले नाहीत, तरीही त्यांनी त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांवर स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, निती टेलर ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे, जी ‘कैसी ये यारियां’मधील नंदिनी मूर्ती, ‘गुलाम’मधील शिवानी माथूर आणि ‘इश्कबाज’मधील मन्नत कौर खुराना या भूमिकांसाठी ओळखली जाते. नितीनं वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी इंडस्ट्रीत पाऊल ठेवत, आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2009 मधील ‘प्यार का बंधन’ या टेलिव्हिजन सीरिअलद्वारे तिनं पदार्पण केलं. ‘कैसी ये यारियां’ या सीरिअलनं तिला मोठी ओळख मिळवून दिली. या मालिकेत पार्थ समथानसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि ही जोडी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक बनली. या सीरिअलनं तिला घराघरांत लोकप्रिय केलं. त्यानंतर, नितीनं अनेक टेलिव्हिजन सीरिअल्समध्ये काम केलं आणि ‘झलक दिखला जा 10’ सारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली. ती शेवटची 2023 मधील ‘बडे अच्छे लगते हैं 2’ या सीरिअलमध्ये दिसलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :