Vaibhav Sooryavanshi 1st International Six England vs India 2nd T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा तब्बल 37 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 99 दिवस या वयात भारतासाठी खेळणारा वैभव हा भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Vaibhav Sooryavanshi’s historic debut, immortalised by Vivek Razdan’s iconic call 👌
Watch #ENGvIND 2nd T20I LIVE NOW on Sony Sports Network TV channels. 📺 #SonySportsNetwork #MamlaPersonalHai #ExtraaaInnings pic.twitter.com/3QxeqQqgM4
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 4, 2026
पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरला ठोकला गगनचुंबी षटकार!
सामन्याची सुरुवातच अत्यंत थरारक आणि अविस्मरणीय झाली. डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर सर्वांना थक्क केले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर वैभवने एका पायावर खाली वाकत, लेन्थच्या खाली जाऊन चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर फेकला. हा एक प्रेक्षणीय षटकार होता. या शानदार षटकारासह वैभवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मंचावर आपली धडाकेबाज एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि फलंदाज वैभव सूर्यवंशी हे दोघेही आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून एकत्र खेळतात.
𝘼𝙖𝙩𝙚 𝙝𝙞 𝙠𝙖𝙖𝙢 𝙨𝙝𝙪𝙧𝙪 𝙠𝙖𝙧 𝙙𝙞𝙮𝙚… 😅
Just the beginning, #VaibhavSooryavanshi smashes his FIRST INTERNATIONAL SIX FOR INDIA! 🙌#ENGvIND 2nd T20I 👉 Streaming LIVE on JioHotstar! pic.twitter.com/5Qa9iPRJ0x
— Star Sports (@StarSportsIndia) July 4, 2026
सचिन तेंडुलकर आणि वॉशिंग्टन सुंदरचा विक्रम मोडला
वैभव सूर्यवंशीने आजच्या पदार्पणासह भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे विक्रम मागे टाकले आहेत. यापूर्वी भारतासाठी सर्वात तरुण वयात पदार्पण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 1989 मध्ये वयाच्या 16 वर्षे 205 दिवसांचा असताना कसोटीत आणि 16 वर्षे 238 दिवसांचा असताना एकदिवसीय (ODI) सामन्यात पदार्पण केले होते. भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात पदार्पण करण्याचा विक्रम वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर होता. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वयाच्या 18 वर्षे 80 दिवसांचा असताना पदार्पण केले होते. आता वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी मैदानात उतरून वैभव सूर्यवंशीने हा सर्वकालीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे संपूर्ण क्रिकेट जगतातून त्याचे कौतुक होत आहे.
वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी संपुष्टात!
डावाच्या सुरुवातीलाच आक्रमक पवित्र्यात असलेल्या वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू विल जॅक्स गोलंदाजीला आला. वैभव पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या तयारीत असल्याचे जॅक्सने आधीच हेरलं आणि हुशारी दाखवत चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर वेगाने टाकला. वैभवने चेंडू कट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला चकवून थेट यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातात गेला. वैभव क्रीझच्या खूप बाहेर गेला होता. जोस बटलरने चेंडू हातात घेताच कोणतीही चूक न करता यष्ट्या उडवल्या. बाद होण्यापूर्वी वैभवने 10 चेंडूत 14 धावांची छोटी पण वेगाने खेळलेली खेळी केली, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता.
हे ही वाचा –