Last Updated:
Shashikant Shinde: शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना आगामी काळातील रणनीती स्पष्ट केली. महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्तापासूनच जमिनीवर काम करण्याच्या सूचना केल्या.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: “सुनेत्रा पवार यांच्या पक्षात सध्या मोठी नाराजी असून तिथेही सगळं काही आलबेल नाही. २०२९ च्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र लढतील की नाही, याबद्दल मोठी शंका आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता आत्तापासूनच २०२९ च्या तयारीला लागावे,” असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे. पुण्यात आयोजित कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप खळबळ झाला आहे.
‘विलनीकरणाच्या चर्चांनी विचलित होऊ नका’
मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलनीकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. “विलनीकरणासारख्या अशा चर्चा ऐकून कार्यकर्त्यांनी अजिबात विचलित होऊ नका आणि मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. आपले मुख्य ध्येय पक्षाचे काम करत राहणे हेच आहे. पक्षाच्या भविष्याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय शरद पवार साहेब घेतील. साहेब जो काही निर्णय घेतील, तो पक्ष म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे मान्य असेल”, असे
‘आपल्याला आपलं सरकार आणायचं आहे’, संघटना मजबूत करण्याचे शशिकांत शिंदेंचे आवाहन
शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना आगामी काळातील रणनीती स्पष्ट केली. महायुतीमधील अंतर्गत संघर्षावर बोट ठेवत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्तापासूनच जमिनीवर काम करण्याच्या सूचना केल्या. “आपल्याला महाराष्ट्रात आपले सरकार पुन्हा आणायचे आहे. त्यासाठी आपली संघटना तळागाळात मजबूत करणे आवश्यक आहे. विरोधकांच्या गोटात चाललेली अस्वस्थता पाहता, आपल्यासाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता कामाला लागा,” असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले. शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी काळात महायुतीत काहीतरी मोठे घडणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
Pune,Maharashtra
