Raigad Accident News : रायगडमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अलिबाग नागोठणे मार्गावर टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नागोठणे आणि अलिबागड मार्गावरील रिलायन्स कंपनी शेजारी हा अपघात घडला आहे. नागोठणे पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
मोटारसायकलस्वराचा जागीच मृत्यू
अलिबाग नागोठणे मार्गावर आज भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात झाला. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मोटारसायकलस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.
सप्तश्रृंगी गड घाटात दरड कोसळली
पावसाच्या संततधारेमुळं नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात रस्त्याच्या मध्यभागी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक व प्रशासनाने मदतकार्य राबवून दरडीचा मलबा बाजूला हटवून तत्काळ वाहतूक सुरळीत केली.
मालेगाव शहरात धक्कादायक घटना, घरातील स्लॅप कोसळल्यानं आजी आणि नातवाचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे घरातील स्लॅप कोसळल्यानं आजी आणि नातवाचा दुर्दैवी अंत झाला आहे. मालेगाव शहर व परिसरात पावसाची संततधारसुरु आहे. या पावसामुळं घराचा स्लॅब कोसळल्याने आजी विमलबाई पंढरीनाथ येवले ( वय वर्ष 80 ) व नातू चेतन रामचंद्र येवले ( वय वर्ष 20 ) यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. येवले कुटुंबीयांत एकूण 5 जण कुटुंबात राहत होते. घटनेनंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी रेस्क्यू करुन घरातील इतर सदस्यांना बाहेर काढलं आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग