नितीन गडकरींनी घाई घाईने आणलं E85 इथेनॉल, लोकांनी दाखवला ठेंगा, Maruti WagonR BioFlex फक्त 3 कार विकल्या! | ऑटो


Last Updated:

आधीच E20 मुळे गाड्यांचे इंजिन आणि मायलेजच्या समस्या निर्माण झाली आहे, अशातच गडकरी यांनी E85 इथेनॉल आणून भारतीयांना मोठा धक्का दिला.

News18
News18

आखाती देशामध्ये युद्धामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमालीचे वाढले आहे. एकीकडे सरकारने इलेक्ट्रिक वाहन वापरण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे लगेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा गाजावाजा करत E85 इथेनॉल इंधन लाँच केलं. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल पंपही सुरू झाले. एवढंच नाहीतर E85 आणि E100 इथेनॉलवर चालणारी Maruti WagonR BioFlex सुद्धा लाँच केली. पण, पहिल्याच महिन्यात लोकांनी या Maruti WagonR BioFlex  कडे पाठ फिरवली. फक्त ३ गाड्यांचीच देशभरात विक्री झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जून महिन्यात E85 इथेनॉलची घोषणा केली आणि मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली. आधीच E20 मुळे गाड्यांचे इंजिन आणि मायलेजच्या समस्या निर्माण झाली आहे, अशातच गडकरी यांनी E85 इथेनॉल आणून भारतीयांना मोठा धक्का दिला. E85 इंधनावर धावण्यासाठी वेगळ्या इंजिनची गरज आहे. हे पाहून देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने लगेच आपली लोकप्रिय  WagonR BioFlex ही लाँच केली. या कारची डिलिव्हरीही सुरू झाली. ही कार E85 आणि E100 इथेनॉलवर धावणार आहे.

पण, असं असलं तरी 29 जूनपर्यंत  WagonR BioFlex चे फक्त 3 यूनिटची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. या कारची किंमत  7.24 लाख रुपयांपासून सुरू होते. पण, लोकांमध्ये आधीच E20 साठी असलेला रोष पाहत विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे.

कशी आहे WagonR BioFlex ? 

Maruti Suzuki Wagon R Flex Fuel ही E85 इंधनासाठी तयार करण्यात आली आहे. पण, मारुती सुझुकीने स्पष्ट केलं आहे की, Wagon R Flex Fuel ही उद्या जर १०० टक्के इथेनॉल आणलं तरी त्यावर धावू शकते. त्यामुळे Wagon R Flex Fuel च्या विक्रीत वाढ होईल, अशी अपेक्षा मारुतीला होती, पण तसं झालं नाही. Wagon R Flex Fuel मध्ये 1.2 लिटर नॅच्युरल पेट्रोल इंजिन दिलं आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7,23,900 इतकी ठेवण्यात आली आहे.

 WagonR BioFlex ची मुंबई किती किंमत?

Maruti Wagon R Flex Fuel ही कार जर विकत घेण्याचा विचार करत असाल तर Maruti Wagon R Flex Fuel ची एक्स-शोरूम किंमत 7,23,900 रुपयांपासून सुरू होते. ही कार जर मुंबईत खरेदी करण्याचा प्लॅन केला तर तुम्हाला ऑन-रोड किंमत ही अंदाजे ८,३७,००० ते ८,४३,००० रुपये इतकी पडेल. कारण, यामध्ये तुम्हाला आर.टी.ओ. शुल्क जवळपास ७९,६००, कार इन्शुरन्स ३२,५०० ते ३९,००० हजार आणि इतर शुल्क हे १५०० रुपये द्यावे लागेल .त्यामुळे या कारची किंमत ८.३७ ते ८.४३ लाखांपर्यंत जाईल.

मराठी बातम्या/ऑटो/

नितीन गडकरींनी घाई घाईने आणलं E85 इथेनॉल, लोकांनी दाखवला ठेंगा, Maruti WagonR BioFlex फक्त 3 कार विकल्या!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *