Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली…


Muslim Actress Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि मॉडेल सौंदस मौफाकिर (Soundous Moufakir) सध्या तिच्या ‘मोरोमा’ (Moroma) या नव्या प्रीमियम स्किनकेअर ब्रँडमुळे चर्चेत आहे. मात्र, ब्रँडच्या लाँचपेक्षा तिच्या घरी आयोजित केलेल्या पूजेमुळे ती अधिक चर्चेत आली आहे. या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काहींनी तिच्या मुस्लिम धर्माबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. यावर अभिनेत्रीनं आता उघडपणे प्रतिक्रिया दिलीय.

मुस्लिम धर्म असलेल्या अभिनेत्री सौंदसनं पूर्ण पारंपरिक विधींनुसार पूजा करण्यासाठी एका ब्राम्हणालाही घरी बोलावलं होतं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती ट्रेडिशनल पिवळ्या रंगाचा ड्रेस वेअर करून आणि हातात पूजेचं ताट घेऊन आरती करताना दिसतेय. या व्हिडीओमध्ये तिच्या टीमचे सदस्यही उपस्थित आहेत. आपल्या नव्या व्यवसायाची सुरुवात शुभ व्हावी, या उद्देशानं या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ शेअर करताना सौंदसनं लिहिलंय की, ईश्वराचा आशीर्वाद घेऊन तिनं नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. आपला ब्रँड योग्य दिशेनं वाटचाल करो, संपूर्ण टीम सुरक्षित राहो आणि सर्वांचे हेतू उदात्त असोत, अशी प्रार्थना तिनं केलीय. तसेच, यश कधीही एकट्यानं मिळत नाही, तर ते संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रमातून आणि विश्वासातून साकार होतं, असंही तिनं नमूद केलंय.  

मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न उपस्थित केलाय की, मुस्लिम असूनही तिनं हिंदू रितीरिवाजांनुसार पूजा का केली? वाढत्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर, सौंदोसनं स्पष्ट केलंय की, तिला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे आणि तिचा धर्म हा तिच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे.

तिने सांगितले की तिच्या टीममध्ये अनेक हिंदू सदस्य आहेत आणि नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी तिला असे वाटले की तिच्या टीमला या प्रसंगाशी आध्यात्मिकरित्या जोडलेले वाटावे. सौंदस मौफाकिरनं आपली बाजू मांडली आहे. त्यानं नमूद केलंय की, ज्याप्रमाणे तिची टीम तिच्या मुस्लिम धार्मिक कार्यक्रमांचा आणि प्रार्थनांचा आदर करते, त्याचप्रमाणे ती सुद्धा त्यांच्या श्रद्धेचा आदर करते. तिच्या मते, एक चांगली टीम तीच असते जिथे प्रत्येकजण स्वतःच्या धार्मिक श्रद्धा जपून इतरांच्याही श्रद्धांचा आदर करतो.

दरम्यान, सौंदस मौफाकिरला ‘MTV रोडिज 2024’ (MTV Roadies 2024) मुळे ओळख मिळाली. त्यानंतर तिनं (MTV स्प्लिट्सव्हिला) (MTV Splitsvilla X4) चं विजेतेपद पटकावलं. ती ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 13) मध्येही झळकली आहे. याव्यतिरिक्त, सौंदसनं ‘फतेह’ (Fateh) आणि ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) सारख्या प्रोजेक्ट्समध्ये तसेच अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये काम केलंय. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *