Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?


Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: ’47 रोनिन’चे दिग्दर्शक कार्ल रिन्श (Director Karl Rinsch) यांना सोमवारी (29 जून) फेडरल न्यायालयानं अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. न्यायमूर्ती जेड राकॉफ यांनी ’47 रोनिन’ मधील अभिनेता कीनू रीव्ह्स (Actor Keanu Reeves) आणि इतर साक्षीदारांनी दिलेल्या रिन्श यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित पुराव्यांचा विचार करत सरकारनं मागितलेल्या शिक्षेपेक्षा निम्मी शिक्षा सुनावलीय.

डिसेंबर महिन्यात ज्युरीनं कार्ल रिन्श यांना वायर फ्रॉड आणि मनी लॉन्ड्रिंग या आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. सरकारी वकिलांनी न्यायालयात सिद्ध केलं की, रिन्श यांनी नेटफ्लिक्ससाठी तयार होत असलेल्या ‘व्हाइट हॉर्स’ या सायन्स-फिक्शन सीरिजच्या निर्मितीदरम्यान सुमारे 1.1 कोटी अमेरिकन डॉलर्सची आर्थिक फसवणूक केलेली. पण, खेदाची बाब म्हणजे, ही फिल्म कधीच पूर्ण झाली नाही. या मोठ्या प्रोजेक्टला पूर्ण करण्याऐवजी, रिन्श यांनी जास्तीत जास्त पैसे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये जुगारात लावले आणि बाकीचे लाखो डॉलर्स लग्झरी वस्तू खरेदी करण्यात खर्च केले. शिक्षा सुनावण्यापूर्वी, लोअर मॅनहॅटनमधील न्यायालयात रिन्शनं न्यायाधीशाला सांगितलं की, “माझ्याकडून चूक झाली… या प्रक्रियेमुळे मला स्वतःबद्दलच्या अशा गोष्टींचा सामना करावा लागला, ज्या मी यापूर्वी कधीच पूर्णपणे समजून घेतल्या नव्हत्या…”

प्रकरण नेमकं काय?

रिन्श आणि त्यांची पत्नी गॅब्रिएला रोसेस यांनी एका प्रोजेक्टची योजना आखली होती. ती म्हणजे ‘ऑरगॅनिक इंटेलिजंट’ (Organic Intelligent) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, मानवासारख्या दिसणाऱ्या कृत्रिम प्रजातीवर आधारित एक विज्ञान-कथा (Sci-Fi) मालिका. या प्रजातीची निर्मिती जगभरात मानवतावादी मदत पुरवण्यासाठी आणि संघर्ष, विनाशकारी युद्धांना कारणीभूत ठरणाऱ्या कट-कारस्थानांचा सामना करण्यासाठी करण्यात आली होती. 

’30WEST’ या निर्मिती संस्थेनं ‘व्हाईट हॉर्स’ (White Horse) नावाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आणि रिन्श, रोसेस यांनी सीरिजचे भाग (Episodes) तयार करण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा निधी संपला, तेव्हा कियानू रीव्हज सह-निर्माता म्हणून यात सामील झाले आणि त्यांनी आवश्यक भांडवल पुरवले. संपूर्ण सीझनसाठी प्रस्ताव मांडण्याकरिता रिन्श आणि रोसेस यांनी 4 ते 10 मिनिटांच्या कालावधीचे सहा लघू भाग तयार केले होते. 2015 ते 2019 या काळात स्ट्रीमिंग सेवांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आशय (Content) मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स या दोन्ही कंपन्यांनी प्रोजेक्टमध्ये रस दाखवला. अखेरीस नेटफ्लिक्सनं प्रोजेक्ट आपल्याकडे घेतला आणि सीरिजच्या प्रोडक्शनसाठी 61.2 मिलियन डॉलर्सची रक्कम टप्प्याटप्प्यानं देण्याचं मान्य केलंय. तसेच, या सीरिजला ‘कॉन्क्वेस्ट’ (Conquest) असं नवं नाव देण्यात आलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

The Ring Star Daveigh Chase Dies: सुपरस्टार अभिनेत्रीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर, एड्समुळे 35व्या वर्षी घेतलेला अखेरचा श्वास, 10 वर्षांपासून होती बेपत्ता अन् बेघर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *