राष्ट्रवादीत कोणत्याही फुटीची किंवा पक्षांतराची चर्चा नाही, शरद पवार जो निर्णय घेतली तो मान्य : खासदार भास्कर भगरे


Bhaskar Bhagare :  शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सस्केसफुल झालं आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिवसेंना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर विधानपरिषदेचे ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनची देखील शिवसेना शिंदे गटाकून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरु आहेत. याबाबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीत कोणत्याही फूट किंवा पक्षांतराची चर्चा नाही. खासदार शरद पवार जो निर्णय  घेतील तो आम्हाला मान्य असे भगरे म्हणाले. 

 पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार एकत्र 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारच्या फूट किंवा पक्षांतराबाबत चर्चा झाली नसल्याचे दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरें स्पष्ट केले. मागील महिन्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत केवळ पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबतच चर्चा झाली असून, कुणी पक्ष सोडणार किंवा दुसऱ्या पक्षात जाणार अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार एकत्र असून, राजकारणात विविध चर्चांना उधाण येत असते. कामानिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी होत असल्या तरी त्यातून वेगळा अर्थ काढण्याचे कारण नाही. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे , प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर सर्वांचा पूर्ण विश्वास आहे. पक्ष संघटने संदर्भातील तसेच भविष्यातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार यांना देण्यात आले असून, ते जो निर्णय घेतील त्यामागे पक्षाचे सर्व खासदार ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त केला.

आमदार, खासदार फुटीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली

आमदार, खासदार फुटीच्या राजकारणामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. काही आठवड्यांपूर्वी ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदेसेनेत गेले. खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असल्याचा दावा सत्ताधारी नेते करताना दिसत आहेत. खासदार फुटीमुळे ठाकरे बॅकफुटवर गेले आहेत. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी पक्ष हा इतर पक्षात विलीन करण्यावरून आमदारांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटीच्या राजकारणानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने पक्षात विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीला प्रस्ताव पाठवला होता. यामागे विरोधी पक्षाची ताकद वाढवण्याचा मानस असल्याचं बोलले जात आहे. यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी देखील अनुकूल असल्याचे बोललं जात होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *