Indigo Flight : आजपासून स्वस्तात मिळतंय हवाई तिकीट! देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय प्रवासावरही मिळेल सूट  | बिझनेस


Last Updated:

Indigo Lite : देशांतर्गत एयरलाइन्स इंडिगोने स्वस्त तिकिटाची सुविधा सुरू केली आहे. कंपनीने एक जुलैपासून याची बुकिंग सुरू केली आणि 15 जुलैपासून तिकिटावर देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करता येईल.

इंडिगो लाइट सर्व्हिस
इंडिगो लाइट सर्व्हिस

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी देशांतर्गत एयरलाइन्स कंपनी इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात तिकीट देण्याचं ऑप्शन सुरू केलंय. विमान कंपनीने इंडिगो लाइट नावानेनवीन सुविधा सुरू केली आहे. ज्या अंतर्गत प्रवाशांना एक जुलैपासून स्वस्त तिकीट बुक करण्याची संधी मिळतेय. या तिकिटावर 15 जुलैपासून प्रवास सुरू केला जाऊ शकेल. नवीन सुविधेअंतर्गत इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी संधी दिली जात आहे.

इंडिगोकडून दिलेल्या माहितीनुसार, जे प्रवासी फक्त केबिन बॅगेजसह प्रवास खरत आहेत. त्यांना इंडिगो लाइट अंतर्गत स्वस्तात तिकीट बुकिंगची संधी दिली जात आहे. अशा प्रकारे तिकीटची बुकिंग इंडिगोच्या डायरेक्ट चॅनलकडून केली जाऊ शकते. यात कंपनीची वेबसाइट, मोबाईल अॅप्लीकेशन आणि कॉन्टॅक्ट सेंटरचा समावेश आहे. तिकीटची बुकिंग 1 जुलैपासून सुरू होईल आणि यावर 15 जुलैपासून प्रवास केला जाऊ शकेल. या सुविधे अंतर्गत देश आणि परदेशात प्रवास केला जाऊ शकेल.

कोणत्या प्रकारच्या प्रवासावर मिळेल सुविधा 

इंडिगो लाइट अंतर्गत बुक केलेल्या तिकिटावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्हीही प्रकारचा प्रवास केला जाऊ शकतो. कंपनीने नॉन-स्टॉप रूटवर वन-वे, राउंड ट्रिप आणि मल्टीसिटी बुकिंगवर याची सुविधा देणार असल्याचं म्हटलं आहे. इंडिगो लाइट अंतर्गत वयस्क आणि मुलांचीही बुकिंग केली जाऊ शकेल. एयरलाइननुसार, अशा प्रकारच्या बुकिंग तिकिटावर फक्त केबिन बॅगेज घेऊन जाण्याची सुविधा मिळते. या सुविधे अंतर्गत कंपनी कमी खर्चात प्रवासाची सुविधा देईल.

एटीएफच्या किंमतीही कमी झाल्या

सरकारनेही एविएशन फ्यूलच्या किमंतीत कपात केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी एटीएफच्या किंमती पाच रुपये लिटरने कमी केल्या आहेत. 1 जुलै पासून 110 रुपये प्रति लिटरची किंमत कमी झाली आहे. सरकारने पेट्रोलियम प्रोडक्टवर निर्यात शुल्कही कमी केलेय. आता पेट्रोलसाठी निर्यात शुल्क 4 रुपये, डिझेलसाठी 8.5 रुपये आणि एटीएफसाठी 7.5 रुपये ठरवलं आहे. खरंतर पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्कात कोणताही बदल केलेला नाही.

मराठी बातम्या/मनी/

Indigo Flight : आजपासून स्वस्तात मिळतंय हवाई तिकीट! देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय प्रवासावरही मिळेल सूट 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *