गद्दार निघाला गोविंदा…, अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, तर बायको थाटणार दुसरा संसार? – Marathi News | Lock upp 2 sunita ahuja need second partner after govinda cheating in marriage with many affairs


बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सुनीता हिने गोविंदा याच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गोविंदा याचे अनेक महिलांसोबत अफेअर होते… असं खुद्द सुनीता यांनी सांगितलं आहे… एवढंच नाही तर, गोविंदा याने नात्यात फसवणूक केल्यानंतर दुसऱ्या पुरुषासोबत नातं सुरु करणार का? यावर देखील सुनिता यांनी मोठा खुलासा केला आहे.

गोविंदा अद्यापही करत आहे, सुनिताची फसवणूक?

‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सिझनच्या नुकतात झालेल्या एपिसोडमध्ये श्रेया कारला हिला सुनिता हिला विचारलं, गोविंदा अद्यापही धोका देतो का आणि तू तुझ्यावर प्रेम करणाऱ्या जोडीदारासोबत राहण्यास तयार आहेस का? यावर सुनीता म्हणाली, ‘असं झालं तर, आता काय होऊ शकतं… हे तर सुरुवातीपासूनच सुरु आहे ना? हिरो आहे म्हणून तुम्ही काहीच बोलू शकत नाही आणि या वयात मी त्यांच्या अफेअरबद्दल अधिक विचार केला तर, माझा डायबिटीज आणखी वाढेल… त्यामुळे आता जसं सुरु आहे, तसंच राहू दिलेलं चांगलं आहे…’

त्यानंतर, श्रेयाने सुनीताला विचारलं की. यामुळे तुला दुःख होतं का. त्यावर त्या स्टार-पत्नीनं उत्तर दिलं की, मी आता केवळ आपल्या मुलांसाठी जगतेय. गोविंदाचं अजूनही कोणाशी अफेअर आहे का किंवा तो तिला फसवतो का, असं विचारल्यावर सुनीता म्हणाल्या, “तुम्ही कोणाला रोखू शकता का? मी 24 तास त्याच्या समोरच बसून राहते का? समोरच्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होईल ना? मी त्याबद्दल विचारच करत नाही.”

सुनीता पुढे म्हणाली, ‘आमच्याकडे दोन घर आहेत. गोवींदाच्या घरात त्याला भेटण्यासाठी अनेक जण येत असतात. मला माझ्या घरात प्रायव्हसी हवी असते.’, दुसऱ्या जोडीदाराबद्दल देखील सुनीता हिने मोठं वक्तव्य केलं. म्हणाली, ‘दुसऱ्या प्रेमाचा शोध घेण्यात मला काहीही रस नाही… कायम मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे…’ पुढे सुनीता म्हणाल्या, ‘मला लहान असताना सांगण्यात आलेलं, जोडीदाराची साथ कधीच सोडायची नाही. पण हिरोला आपण आपल्या नियंत्रणात नाही ठेऊ शकत….

गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न

गोविंदा आणि सुनीता यांनी 1987 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहे. त्यांच्या मुलगीचं नाव टीना आणि मुलाचं नाव यशवर्धन आहे… नुकताच अशी देखील माहिती समोर आली की, गोविंदा आणि सुनीता आता एकत्र राहत नाहीत, एवढंच नाही तर, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण सुनीताने घटस्फोटाच्या फेटाळल्या. पण यावर गोविंदा याने मौन ठेवलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *