Gaurav Khanna on Divorce:’.. मी माघार का घेईन?’ बायकोनं घटस्फोटाची घोषणा करताच ‘बिग बॉस’ विजेत्या अभिनेत्यानं मौन सोडलं; सोशल मीडियावर चर्चेला उधाण; कारण काय ?


Gaurav Khanna on Divorce: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिगबॉस 19 चा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी वेगळे होत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.  नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप 2 ‘ या रियालिटी शोमध्ये गौरव खन्नाची बायको आकांक्षा चामोलाने (Akanksha Chamola)  घटस्फोट घेत असल्याचं सांगत सगळ्यांनाच धक्का दिला. ते दोघेही गेल्या एक वर्षांपासून वेगळं राहत असल्याचेही तिने सांगितलं. आता या सगळ्या प्रकरणावर अभिनेता गौरव खन्नाने मौन सोडले आहे. ‘बिग बॉसच्या 19’ व्या सीजन पासूनच दोघांचे मतभेद असल्याची चर्चा होती. या सगळ्या चर्चेनंतर गौरव खन्नाच्या वक्तव्याने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. ती माझी पत्नी आहे.मी एखाद्यावर प्रेम केलं असेल तर मी माघार का घेईन ?असं म्हणत त्याने त्याच्या घटस्फोटाच्या निर्णयावरून आपली प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाला गौरव खन्ना ?

अभिनेता गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला  सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यमुळे मनोरंजनसृष्टीत आणि सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अलीकडेच दोघे ‘लॉक अप 2 ‘ या रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी आकांक्षाने सगळ्यांसमोर त्यांचा घटस्फोट होणार असल्याचा सांगितलेलं. ‘आता ती कपलसारखी फिलिंग राहिली नसल्या ‘चेही ती म्हणाली होती. तिच्या गौप्यस्फोटानंतर आता गौरव खांना याने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला .’लाफ्टर शेप्स’च्या सेटवर तो उपस्थित होता.त्यावेळी त्याच्या घटस्फोटाविषयी त्याला विचारण्यात आलं.. तेव्हा तो म्हणाला ‘सर्वकाही पूर्वीसारखेच आहे.प्रेम आणि पाठिंबा आजही तितकाच भक्कम आहे.मी नेहमीच आकांक्षाला पाठिंबा देईन.शेवटी ती माझी पत्नी आहे.जर मी एखाद्यावर प्रेम केलं असेल तर, मी माघार का घेईन ?’ असं तो म्हणाला.

पण आकांक्षाने तर, घटस्फोटाचं भर शोमध्ये सांगितल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.यावरही गौरव खन्ना म्हणाला ‘ मी आकांक्षाला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.ती चांगली कामगिरी करेल आणि विजयी होईल याची मला आशा आहे.मी कधीही माघार घेणार नाही.तिला पाठिंबा देणं असंच सुरू ठेवेन. ‘ असं तो म्हणाला.त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान आकांक्षाचेही काही व्हिडिओ समोर येत आहेत.तिला कधीच आई होण्याची इच्छा नव्हती.गौरवने हे सुरुवातीला मान्य केले होते, मात्र आता त्याला मुले हवी आहेत.माझ्या स्वभावाला आणि जीवनशैलीला ही गोष्ट साजेशी नाही, त्यामुळे घटस्फोट होत असल्याचं त्या संभाषणात बोलताना दिसतेय.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *