Shukra Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलैचा महिना सुरु झाला आहे. त्यानुसार, येत्या 4 जुलैपासून शुक्र ग्रह केतूच्या छायेत येणार आहे. हिंदू पंचांगानुसार, 4 जुलै रोजी शुक्राचं राशी परिवर्तन होणार आहे. या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करतील. या ठिकाणी केतू आधीपासूनच विराजमान आहे. म्हणजेच, या दरम्यान सिंह राशीत शुक्र-केतूची युती होणार आहे. दुसरीकडे, 4 जुलै रोजी शुक्राचं नक्षत्र परिवर्तनही होणार आहे. केतू ग्रह अश्लेषा नक्षत्रातून मघा नक्षत्रात प्रवेश करतील.
ज्योतिष शास्त्रानुसार, केतूच्या छायेत प्रवेश केल्यानंतर शुक्र ग्रह चार राशींना शुभ फळ देणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुम्ही काही नवीन योजना राबवाल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, काही महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम करण्यास सुरुवात कराल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
जे लोक क्रिएटिव्ह फिल्डशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्या नवीन ओळखी निर्माण होतील. तुमच्या व्यवसायाला चांगली चालना मिळेल. तसेच, प्रवासाचे योगदेखील जुळून येणार आहेत. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ सकारात्मक ठरणार आहे. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुमच्या कार्याने लोक प्रभावित होतील. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. पैशांच्या गुंतवणुकीतून देखील तुम्हाला चांगला लाभ मिळणरा आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
July Month Grah Gochar 2026 : जुलै महिन्यात शनि, सूर्य आणि बुधासह ग्रहांचं महासंक्रमण; फक्त 4 राशींचं उजळणार भाग्य, 8 राशींवर संकटाचं सावट…
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात…