विजयाबाई गेल्या… रंगभूमी पोरकी झाली, नानांसह अनेकांना घडवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन – Marathi News | Veteran director Vijaya Mehta passes away big loss for film industry


मराठी कलाविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता ह्यांचं त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले अशी दिग्गज कलाकारांच्या यशामागे त्यांना मोलाचे योगदान आहे. आज विजया मेहता यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रख्यात चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचे वृद्धापकालाने निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी समांतर सिनेमा आणि नाट्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय देखील केला आहे.त्या ६० च्या दशकातील मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील एक प्रमुख व्यक्तीमत्व होत्या. त्यांच्या जाण्याने रंगभूमी पोरकी झाल्याचे म्हटले जात आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *