राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर


मुंबई : राज्यातील एसआयआरचा पहिला गणना पत्र भरुन घेण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये दोन कोटी सात लाख (21.15 टक्के) मतदारांचे गणनापत्र जमाच झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. तर या एसआयआरच्या मोहिमेमध्ये जवळपास साडे  सतरा लाख दुबार मतदार आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये चालु असलेल्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision) कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरुन घेण्याचा कार्यक्रम दिनांक 30 जून 2026  ते दिनांक 17 ऑगस्ट 2026  या कालावधीत राबवण्यात आला होता.

राज्यातील एकूण 9.78 कोटी इतक्या मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांना त्यांचे गणना पत्र प्राप्त 

या कालावधीत राज्यातील एकूण 9.78 कोटी इतक्या मतदारांपैकी 7.71 कोटी (78.85 टक्के) मतदारांना त्यांचे गणना प्राप्त झाले. 2.07  कोटी (21.15 टक्के) इतके मतदार नियमानुसार / प्रत्यक्ष वस्तुस्थितीनुसार प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास अपात्र असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना Uncollectable EF या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.

पुढील कारणांमुळे गणनापत्र प्राप्त झाली नाही

आढळून न आलेले / गैरहजर (Absent) – 75.52 लाख

कायमस्वरुपी स्थलांतरित (Permanently Shifted)-76.80  लाख

मृत – 34.81 लाख

 दुबार मतदार – 17.63 लाख

इतर – 2.23 लाख

प्रारुप मतदार याद्या लवकरच प्रसिध्द करण्यात येणार

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारुप मतदार याद्या लवकरच प्रसिध्द करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार याद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षाना सॉफ्ट व हार्ड कॉपीच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येतील. ज्यांची नावे प्रारुप मतदार यादीमध्ये नियमानुसार समाविष्ट करता आली नाहीत अशा Uncollected EF गटातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित शासकीय कार्यालयांच्या सुचना फलकावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाणार

प्रारुप मतदार याद्य प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एका महिन्याच्या कालावधीत सदर प्रारुप यादीच्या अनुषंगाने दावे व हरकती दाखल करता येतील. प्रारुप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेले मतदार किंवा दि. 1.10.2026 या अर्हता दिनांकापुर्वी वयाची 18 वर्षे पुर्ण केलेले नव मतदार यांना या कालावधीत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडुन सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. 27 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाणार आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *