फरशी चमकण्यासोबत घरात दरवळेल सुगंध, स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींपासून बनवा क्लिनर – Marathi News | Make a cleaner using these kitchen staples to make your floors shine and fill your home with a pleasant fragrance


आपल्या घरातील पांढरी शुभ्र फरशी घर स्वच्छ आणि प्रशस्त लूक देते. मात्र याच फरशीची नीट निगा राखली गेली नाही तर धूळ, पायांचे ठसे, डाग पटकन दिसून येतात. त्यात घरात लहान मुल असेल तर पांढरी फरशी अजूनच खराब होते. तर फरशीवरील डाग काढण्यासाठी बाजारातील केमिकल क्लिनरचा वापर करण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील काही साहित्य वापरून घरगुती क्लिनर बनवू शकता. हे केमिकलमुक्त असल्यामुळे, त्यामुळे कोणतीही हानी होण्याची शक्यता कमी असते. हा क्लिनर केवळ तुमच्या फरशीला चमकदारच करणार नाही, तर तुमच्या संपूर्ण घरात एक सुखद सुगंध पसरवेल आणि कीटकांना दूर ठेवेल. चला आजच्या लेखात आपण क्लिनर कसे बनवायचे हे स्टेप बाय स्टेप पद्धतीने जाणून घेऊयात.

पावसाळ्यात दमटपणा आणि त्यामुळे होणारा लहान कीटकांचा प्रादुर्भाव खूप त्रासदायक ठरू शकतो. बाजारातून क्लिनर विकत घेण्याऐवजी ती घरीच बनवणे हा एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतो.

क्लिनर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 ते 3 कापराच्या गोळ्या

2 मोठे चमचे बेकिंग सोडा

3 चमचे पांढरे मीठ

1 ते 1.5 ग्लास पाणी

2-3 चमचे पांढरा व्हिनेगर

दोन मोठ्या लिंबांचा रस

सुगंधासाठी कोणत्याही सुगंधी तेलाचे 5-6 थेंब

या पद्धतीने क्लिनर बनवा

एका भांड्यात पाणी घ्या. आता त्यात कापूराची पूड करून टाका, त्यानंतर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून चमच्याने सर्व मिश्रण ढवळा. लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाका आणि मिक्स करा. नंतर हे मिश्रण एका बाटलीत ओता. त्यात इसेन्शियल ऑइल टाकून झाकण घट्ट लावून बाटली चांगली हलवा. अशाप्रकारे केमिकलमुक्त घरगूती पद्धतीने बनवलेला फरशी क्लिनर तयार आहे.

हे क्लिनर वापरण्यासाठी, तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यात दोन ते तीन झाकणे टाकू शकता. किंवा डाग असलेल्या भागावर थेट टाकले तरी उत्तम. हे क्लिनर घाण आणि कीटकांनाही प्रतिबंध करेल.

हा क्लिनर कसा काम करतो?

या क्लिनरमध्ये सुगंधी तेल, कापूर आणि लिंबू असल्याने संपूर्ण घरात एक सुखद सुगंध पसरतो. बेकिंग सोडा साफसफाई करताना दुर्गंधी शोषून घेण्यासही मदत करतो आणि व्हिनेगर एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लिनर आहे. मीठ देखील एक उत्तम स्वच्छताकारक आहे आणि माश्यांना दूर ठेवते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *