दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. दिशा सालियन यांच्या वडिलांनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणात आता शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणालेत रामदास कदम हे वाचूयात…
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणी टीका केली आहे. ते पुढे म्हणतात की सत्यमेव जयते… जय सत्य होतं. आदरणीय न्यायालयाच्या माध्यमातून आता या प्रकरणाला पुढ आला आहे. आदित्य ठाकरे आरोपी आहेत का? मुलीवर बलात्कार झाला आहे का? या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी याप्रकरणात रामदास कदम यांनी केली आहे.
रामदास कदम यांनी या प्रकरणात आरोप करताना म्हणाले की मध्यंतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा पुरावे नष्ट करण्याचे काम झाले आहे का? याचा तपास झाला का याची चौकशी देखील झाली पाहिजे असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.आता तर दिशा सालियन हिच्या वडिलांनीच आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि सकाळी सहा वाजता कोठून यायचे? आदित्य ठाकरे यांचे नाईट लाइफ काय होते ते रात्री कुठे जायचे, असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. “बाळासाहेबांनी कमावलं आणि या लोकांनी गमावलं,” अशी टीका रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मनोज जरांगे यांची आहे, आता सणासुदीचे दिवस आहेत.पण त्यांनी थोडेसे सबुरीने घ्यावं. आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय व्हायला नको ही सरकारची भूमिका आहे असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.