त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की.. – Marathi News | Pat Cummins voice his support for former Pakistan all rounder and prime minister Imran Khan


त्यांच्यासोबत….! इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पॅट कमिन्स मैदानात, स्पष्टच म्हणाला की..Image Credit source: TV9 Network/File

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरूंगात आहेत. ऑगस्ट 2023 पासून पाकिस्तानातील रावळपिंडी येथील आदियाला तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. भ्रष्टाचार आणि सरकारी भेटवस्तूंचा गैरवापर प्रकरणात दोषी धरलं होतं आणि 5 ऑगस्ट 2023ला लाहोरमधील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांना 14 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच गेल्या  तीन वर्षांपासून एका छोट्या खोलीत बंदीस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी 80 टक्के कमी झाली आहे. तसेच त्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोपा इम्रान खान यांच्या मुलांनी केला. पण हे सर्व आरोप पाकिस्तान सरकारने फेटाळून लावले आहेत. असं असताना जगभरातून इम्रान खान यांच्या ढासळत्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आरोग्याच्या तक्रारीनंतर जगातील 21 माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना मानवतावादी पत्र लिहिलं आहे. आता पॅट कमिन्सनेही या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

द ग्रेड क्रिकेटर या ट्वीटर हँडलवरून ग्रेग चॅपल यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात त्यांनी इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ग्रेग चॅपेल म्हणाले की, मी सहा वर्षांपूर्वी इम्रान खान यांना पाकिस्तानात भेटलो होतो, तेव्हा 73 वर्षांचे असूनही ते अत्यंत मजबूत आणि तंदुरुस्त दिसत होते. पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही, त्यांची प्रकृती खूप खालावली आहे.

ग्रेग चॅपेल यांचा व्हिडीओ रिट्वीट करत पॅट कमिन्स म्हणाला की, ‘मी येथे ग्रॅग चॅपेल आणि इतर माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांच्या मोहिमेला माझा पाठिंबा देत आहे. मला आशा आहे की कोर्टाने आदेश दिलेली वैद्यकीय तपासणी व्यवस्थित पूर्ण केली जाईल आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी कायम राहील. मला आशा आहे की इम्रान खान यांना कोणत्याही व्यक्तीला मिळायला हवा तसा ‘आदर आणि सन्मान’ तुरुंगात दिला जाईल.’

इम्रान खान यांच्यावर काय आरोप आहे?

इम्रान खान यांच्यावर एकाच वेळी 100 पेक्षा जास्त खटले सुरू आहेत. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांनी एका मोठ्या इस्टेट व्यावसायिकाला वाचवण्यासाठी लाच म्हणून कोट्यवधीचीं जमीन दान म्हणून घेतल्याचा आरोप आहे. इतकंच काय तर इम्रान खान 2018 ते 2022 या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. पंतप्रधान असताना (त्यांना सौदी अरेबिया आणि इतर देशांकडून कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि महागडी घड्याळे भेट म्हणून मिळाली होती. त्यांनी या भेटवस्तू तोशाखान्यातून कमी किमतीत विकत घेतल्या आणि नंतर खुल्या बाजारात विकून मोठा नफा कमावला. ज्याचा हिशोब त्यांनी निवडणूक आयोगाला दिला नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *