तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजाच्या चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला – Marathi News | Ravindra Jadeja took last 22 DRS reviews struck down as a bowler in Tests know all details


तीन वर्षांपासून तसंच घडतंय, रवींद्र जडेजा चुका आणि गिलला बसतोय फटका! तब्बल 22 वेळा फसला Image Credit source: PTI

श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे. चौथ्या दिवशी उर्वरित दोन खेळाडूंना झटपट बाद करून फॉलोऑन देण्याची संधी चालून आली आहे. पण तिसर्‍या दिवशी शेपटच्या फलंदाजांनी टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. खरं तर 200 धावांच्या आत बाद करण्याची संधी होती. पण तसं झालं नाही. असं असताना रवींद्र जडेजामुळे कर्णधार गिलचं तिसऱ्या दिवशी नुकसान झालं आहे. रवींद्र जडेजा मॅच विनर खेळाडू आहे. त्यामुळे कर्णधाराचा त्याच्यावर विश्वास असणं सहाजिकच आहे. पण त्याच्या अति आत्मविश्वासाचा फटका मात्र टीम इंडिया आणि खास करून शुबमन गिलला बसत आहे. कारण रवींद्र जडेजाचं म्हणणं टाळणं गिलला काही जमेना आणि त्याचं ऐकून नुकसान काही टळेना, अशी स्थिती झाली आहे. रवींद्र जडेजाने शुबमन गिलसोबत तिसऱ्या दिवशी नेमकं काय केलं ते जाणून घेऊयात..

रवींद्र जडेजाचं म्हणणं ऐकणं म्हणजे चूक…!

रवींद्र जडेजा भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याचं म्हणणं संघातील बहुतांश खेळाडू ऐकतात. यात शुबमन गिलही मागे नाही. पण जडेजाची प्रत्येक गोष्ट ऐकणं आता गिलच्या अंगलट यायला लागलं आहे. डीआरएस घेताना जडेजा मागच्या तीन वर्षात वारंवार फेल जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी असंच झालं. केशारा नुवांता विरुद्ध जडेजाने एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पंचांनी त्याला नाबाद दिलं पण जडेजाने गिलला रिव्ह्यू घेण्यास भाग पाडलं. गिलने त्याचं ऐकलं आणि रिव्ह्यू घेतला. पण त्याचा निर्णय पूर्णपणे चुकला. चेंडू नुवांताच्या बॅटला लागला होता आणि एक रिव्ह्यू वाया गेला.

जडेजाने रिव्ह्यू घेणं म्हणजे वाया घालवणं!

रवींद्र जडेजाला चुकीचा रिव्ह्यू घेण्याची जणू सवयच लागली आहे. कसोटी क्रिकेट रवींद्र जडेजाने गोलंदाजी करताना मागच्या तीन वर्षात 22 वेळा केलेल्या अपीलसाठी रिव्ह्यू घेतले आहेत. यात फक्त 4 रिव्ह्यू अम्पायर्स कॉल’ ठरले आहेत. जडेजाने शेवटचा योग्य ठरलेला रिव्ह्यू जुलै 2023 मध्ये घेतला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात केमार रोचला नाबाद दिलं होतं. तेव्हा त्याने घेतलेला हा रिव्ह्यू बदलला गेला आणि बाद दिलं गेलं. त्यानंतर गोलंदाज म्हणून घेतलेला एकही रिव्ह्यू यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे जडेजा सांगेल ते बरोबरच आहे याकडे गिलने थोडं दुर्लक्ष करायला हवं. विकेटकीपर काय सांगतो याकडे लक्ष दिलं पाहीजे. माजी कर्णधार रोहित शर्मा रिव्ह्यू घेताना ही काळजी घ्यायचा.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *