Last Updated:
‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’, ‘कोरडी भिक्षा’ यांसह त्यांच्या ललित लेखनातून वाचकांना निसर्ग, माणूस आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा अनुभव मिळाला.
सातारा: “डोह” या प्रसिद्ध कांदबरीचे लेखक, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कथाकार आणि ललित लेखक ‘डोह’कार श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वातील एक संवेदनशील आणि समृद्ध साहित्यिक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
