ठाण्यात रक्तरंजित थरार, गावगुंडाने बड्या पोलीस अधिकार्‍याला जागीच संपवलं – Marathi News | Thane police sub inspector kisan bhoir attack by local goons latest marathi news


ठाण्यातून हादरवणारी बातमी आली आहे. ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली आहे. एका गावगुंडाने ठाण्यात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची हत्या केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येने संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे. याघटनेनंतर पोलीसच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर यांची गावगुंड आरोपी राजू वाल्मिकी याने हत्या केली. काही दारुची दुकाने रात्री उशीर पर्यंत सुरू आहेत, त्या ठिकाणी पीएसआय भोईर कारवाई करायला गेले होते. तेथे राजू वाल्मिकी नावाचा गुंड रस्त्यावरच दारू पीत बसला होता. गस्त घालत असताना पीएसआय किसन भोईर यांना माहिती मिळाली होती. पीएसआय भोईर यांनी त्याला हटकले आणि पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. यात दोघांमध्ये बाचाबाच झाली. त्यानंतर राजूने दिलेल्या धक्क्याने किसन भोईर जमिनीवर कोसळले. त्यावेळी ते जोरात डोक्यावर आदळले. पीएसआय किसन भोईर यांना धक्का दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी राजू वाल्मिकी याला तात्काळ अटक करण्यात आली. चितळसर मानपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

त्या रात्री काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, किसन भोईर हे कर्तव्यावर होते. ते रात्रीची गस्त करत होते. भोईर हे पोखरण रोड क्रमांक दोन परिसरातील गांधीनगर, सुभाषनगर या ठिकाणी होते. त्यावेळी आरोपी राजूने धक्का दिल्यानंतर पोलीस अधिकारी भोईर यांच्या डोक्यात बांबूने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात भोईर गंभीर जखमी झाले होते. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याने ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागे नेमकं कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरूडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेची देखील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी भोईर हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *