जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया


जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Election) राष्ट्रवादीच नेते तथा माजी मंत्री अनिल पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकासाठी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. भाजपचे (BJP) उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतल्याने जयश्री पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या (Jalgaon) राजकारणात अनिल पाटील यांचा दबदबा कायम असल्याचे चित्र आहे. तर, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत, 80 टक्के जागांबाबत वाटाघाटी झाल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. 

जळगावमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री महाजन या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध झाल्याने पाटील यांनी गुलाल उधळला आहे. तर, पत्नी जयश्री महाजन हिने राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे, तिच्या कर्तृत्वावर ती बिनविरोध निवडून आल्याचं आ. अनिल पाटील यांनी बिनविरोध निवडीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले. मात्र, महायुती म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढणार असल्याने जागावाटपानंतर कार्यकर्त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती करणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

जळगाव जिल्हा बँक निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढणार आहोत. येथील 80 टक्के जागांबाबत आमच्या वाटाघाटी झाल्या आहेत, उर्वरित दोन- तीन जागांबाबत आम्ही एकत्र बसून तोडगा काढणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. निवडणूक महायुतीमध्ये असल्याने आमच्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊ नये. यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या पक्षाला जागा सुटल्या असतील त्या ठिकाणी अन्य पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले जातील, तशी विनंती आम्ही कार्यकर्त्यांना करणार आहोत, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. 

मविआकडून एका जागेची मागणी

जळगाव बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सर्वपक्षीय निवडणूक लढविण्याबाबत आग्रह केला जात आहे. एका जागेची ते मागणी करत आहेत, मात्र आमच्या मध्येच प्रत्येक जागेसाठी चढा ओढ आहे. त्यामुळे, मविआला एक जागा दिली तर आमची एक जागा कमी होणार आहे, याबाबत आज संध्याकाळी होणाऱ्या आमच्या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. 

उद्या आणखी जागा बिनविरोध होतील – गुलाबराव पाटील

दरम्यान, जळगावमधील आजच्या जयश्री पाटील यांच्या बिनविरोध निवडीनंतर शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जळगाव जिल्हा बँक जागावाटपाचा तिढा संपुष्टात येईल, थोड्या वेळात आमची बैठक होणार आहे, तो तिढा सुटेल, असे त्यांनी म्हटले. तसेच, उद्या आणखी जागा बिनविरोध होतील, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा बँकेच्या एकूण 21 जागांसाठी येत्या 29 तारखेला  निवडणूक होत आहे, या निवडणुकीपूर्वीच 4 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 

हेही वाचा

भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *