चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या खेळाडूचा मैदानावर धुमाकूळ, 234 च्या स्ट्राईक रेटने वादळी खेळी, एकहाती सामना दिला जिंकून


Dewald Brevis : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी करुन आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. नामिबियामध्ये सध्या मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज विंडहोक येथे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. ब्रेविसच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने सामना 7 गडी राखून जिकंला आहे. डेवाल्ड ब्रेविसने वादळी खेळीनं अवघ्या 13 षटकातच सामना जिंकता आला. 2 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 75 धावांची खेळी केली. या खेळीसाठी ब्रेविसला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या होत्या

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या होत्या. सलामीवीर ब्रायन बेनेटने 4 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 34 धावा केल्या. ताडीवानाशे मारुमानीने 30 धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज 25 धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने केवळ 3 गडी गमावून 13.4 षटकांत सामना जिंकला. या सामन्यात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने 234 च्या स्ट्राईक रेटने एक दमदार खेळी केली, त्याच्या खेळीन आफ्रिकेला एकहाती सामना जिंकता आला. वघ्या तरा षटकांमध्येच सामन्याचा निकाल डेवाल्ड ब्रेविसने आपल्या संघाच्या बाजून लावला.

ब्रेविसने 6  षटकार आणि 7  चौकार मारुन सर्वांचे लक्ष वेधलं

आफ्रिकेची पहिली विकेट 32 धावांवर पडल्यानंतर, ब्रेविस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने 32 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 75 धावांची खेळी केली. या खेळीसाठी ब्रेविसला ‘सामनावीर’ म्हणून गौरविण्यात आले. त्याच्या खेळीमुळे संघाला एकतर्फी विजय मिळाला. या विजयामुळे आफ्रिकेला नक्कीच सुटकेचा निःश्वास टाकता आला असेल. ब्रेविस व्यतिरिक्त, सलामीवीर लुहान-ड्रे प्रिटोरियसने आफ्रिकेसाठी 22 धावा केल्या. त्याचा सहकारी सलामीवीर जॉर्डन हार्मनने 20 धावा केल्या. टोनी डी जॉर्जीने 15 धावा केल्या. ब्रेविसला साथ देताना रुबिन हार्मनने नाबाद 11 धावा केल्या.

मागील सामन्यात नामिबियाकडून पराभव 

त्रिकोणीय मालिकेतील पहिला सामना आफ्रिका आणि नामिबिया यांच्यात खेळला गेला. हा सामना अनपेक्षितपणे पार पडला. यजमान नामिबियाने आफ्रिकेचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, नामिबियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 163 धावा केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या 20 षटकांत 9  गडी गमावून 145 धावांवर रोखण्यात आले. झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवल्यास, दक्षिण आफ्रिका मालिकेत आपले आव्हान कायम ठेवू शकेल.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *