किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीवर उदित नारायण यांना गायकाने दिलेला एकच सल्ला; उघडपणे सांग की.. – Marathi News | Abhijeet Bhattacharya reveals advice to Udit Narayan after kiss row here is what he said


प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गेल्या वर्षी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहतीला किस करताना दिसले होते. पद्मश्री आणि पद्मभूषणसारख्या पुरस्कारांनी सन्मानित गायकाचं असं वर्तन शोभून दिसत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. त्यावेळी उदित नारायण यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी त्या वादग्रस्त काळात उदित यांना कोणता सल्ला दिला, याचा खुलासा केला आहे. इंडस्ट्रीतल्या दोन सहकाऱ्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठिशी उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं. 2017 मधील अझानच्या वादातही सोनू निगमची साथ दिल्याचं अभिजीत यांनी स्पष्ट केलं. या दोन्ही गायकांचा जाहीरपणे बचाव करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी ते एक होते.

सुभोजित घोष यांच्याशी बोलताना अभिजीत भट्टाचार्य म्हणाले, “मी उदित नारायण यांना असा सल्ला दिला होता की, मोठ्या प्रमाणावर टीकेला कारणीभूत ठरलेली घटना नाकारू नये, उलट ती स्वीकारून पुढे जावं. उदित यांनी हार मानल्यानंतरही मी त्यांच्या पाठिशी उभा राहिलो होतो. मी त्यांना म्हणालो, फक्त हो म्हणा. कोणीतरी मला किस केलं म्हणून मी किस केलं. हे उघडपणे सांगा की, जर माझे चाहते मला किस करायला किंवा मिठी मारायला आले तर मीसुद्धा करेन. मी त्यांच्या समर्थनार्थ बोललोसुद्धा होतो. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही उदित नारायण आहात. जर लोक तुम्हाला किस करणार नाहीत, तर ते कोणाला किस करणार? जर 50 लोकांनी तुम्हाला किस केलं आणि तुम्ही त्यापैकी एकाला परत किस केलात, तर त्यात एवढं काय विशेष? तुम्ही फक्त म्हणा.. हो मी केलं.”

व्हिडीओ-

व्हायरल व्हिडीओवर नंतर उदित नारायण यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं, “मला त्याबद्दल अजिबात पश्चात्ताप नाही. मला कशाला लाज वाटेल? ते काही गलिच्छ किंवा गोपनीय नव्हतं. सार्वजनिक ठिकाणी ती गोष्ट घडली होती. माझं मन पवित्र आहे. शुद्ध प्रेमाच्या कृतीत जर काही लोकांना घाणेरडंच पहायचं असेल तर मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतं. उलट त्यांनी या व्हिडीओला घाणेरडं म्हटल्याने मला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे मी त्यांचे आभारच मानतो.”





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *