Eknath Khadse on BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांचा नुकताच अमृत महोत्सवानिमित्तचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांसह राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पण, भाजपाकडून मात्र एकदोन नेते सोडले तर फारसा प्रतिसाद मिळाला नाही, ते येऊ शकले नाहीत, याच आपल्याला दुःख असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
आपल्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वच पक्षाच्या नेत्यांना बोलविले होते. यातील अनेकांनी हजेरी लावली मात्र भाजपमध्ये आपण चाळीस वर्ष काम केल्याने अनेक नेत्यांशी आपले घनिष्ट संबंध आजही कायम राहिले आहेत. ते येतील अशी अपेक्षा होती. मात्र ते येऊ शकले नाही याचे दुःख आहे असे एकनाथ खडसे म्हणाले. आता भाजपामध्ये 80 टक्के लोक हे अन्य पक्षातून आले आहेत. त्यातील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.त्यामुळं त्यांना आमच्या सारख्या लोकांनी भाजपा वाढवण्याच्या साठी काय मेहनत घेतली आहे हे माहीत नाही. त्यांच्या कडून काय अपेक्षा करता येईल असेही खडसे म्हणाले.
दोन दिवसात जेवढी गर्दी झाली तेवढी गर्दी कोणत्याही सभेला झाल्याचं पाहिलं नाही
गेली अनेक वर्ष पासून आपण गोर गरीब जनतेच्या साठी, समाज सेवेचा वसा हाती घेतला आहे. यापुढेही तो कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपल्या वाढ दिवसाला या दोन दिवसात जेवढी गर्दी झाली तेवढी गर्दी कोणत्याही सभेला किंवा वाढदिवसाला झाल्याचं कधी पाहायला मिळाले नव्हते. तो प्रतिसाद आज पाहायला मिळाला आहे असे खडसे म्हणाले.
अद्यापही अनेक भागात पाऊस नाही, शेतकरी अडचणीत
यंदा अनेक भागात अद्यापही पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीत आहेत. या आठवड्यात पाऊस येईल असा अंदाज आहे, तो आला तर आनंद आहे. मात्र नाही आला तर सरकारने पुढे येऊन अशा शेतकऱ्यांना मदत करायला हवी अनेक शेतकरी पाऊस नसल्याने आपली शेती नांगरून टाकण्याच्या विचारत आहेत. काही जण आत्महत्या करु शकतात, हे पाहता सरकारने मदत करायला हवी असे मत खडसेंनी व्यक्त केले. मनोज जारंगे यांचे त्यांच्या मागण्या साठी आंदोलन सुरु आहे. सरकार आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. त्यातूनर्ग निघेल अशी अपेक्षा असल्याचंही खडसे यांनी म्हटलं आहे.
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती