अनैतिक संबंध ठेवणे अंगाशी आले,पत्नीचा त्या व्हिडीओने ब्लॅकमेलिंग सुरु, मग जे घडले ते कल्पनेपलिकडचे… – Marathi News | Baghpat murder case: Husband kills wife’s lover after an obscene video of her is made.


बागपत येथे दिवसाची सुरुवातच भयानक झाली. टी स्टॉल चालवणाऱ्या एका दाम्पत्याचे शेजारील दुकानात इलेक्ट्रीशियनचे काम करणाऱ्या तरुणाशी जोरदार भांडण झाले.या भांडणात दाम्पत्यातील महिले अचानक लोखंडी रॉड आणून त्या तरुणाला पतीच्या मदतीने बेदम मारहाण केली. अखेर पतीन हातोडी आणत त्या तरुणावर अनेक वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला नजिकच्या रुग्णलयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून जाहीर केला. या भांडण आणि हत्ये मागे नक्की काय कारण आहे हे कळलेले नाही. मात्र यामागे अनैतिक संबंध, अश्लिल व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग सारख्या गोष्टीतून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पती आणि पत्नी चहाचा स्टॉल चालवत होते. या स्टॉलच्या समोरच एक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान होते. तेथे काम करणाऱ्या एका तरुणाचे चहावाल्याच्या पत्नीशी ओळख वाढत हळूहळू त्यांचे संबंध आले होते. हा प्रकार उत्तर प्रदेशातील बागपत येथील असून येथील एका मार्केटमध्ये राहुल त्याच्या पत्नी सोबत एक टी स्टॉल चालवत होता. टी-स्टॉलच्या थेट समोर विकास इलेक्ट्रॉनिक नावचे दुकान होते. या दुकानात शिकोहपुर निवासी दीपेंद्र हा इलेक्ट्रीशियन काम करत होता. सकाळी मार्केटमध्ये दुकाने सुरु होत होती आणि लोक आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. त्याच वेळी राहुल आणि दीपेंद्र यांच्या हाणामारी सुरु झाली. पाहाता पाहाता ही हाणामारी रक्तरंजित पातळीवर उतरली. राहुल याच्या पत्नीने लोखंडी रॉडने दीपेंद्र याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर राहुल याने एक हातोडी घेऊन दीपेंद्रवर अनेक वार केले. मार्केटमध्ये अचानक झालेल्या घटनेने सर्वजण हादरले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचली आणि गंभीर जखमी झालेल्या दीपेंद्र याला रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत करण्यात आले. घटनेनंतर राहुल आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपेंद्र आणि राहुल यांची पत्नी सोनिया यांचे दुकान आणि दीपेंद्र काम करत असलेल्या दुकानासमोर असल्याने त्यांच्यात मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्याच वेळी दीपेंद्र याने सोनियाचा एक आपत्तीजनक व्हिडीओ चित्रीत केला होता. त्यानंतर दीपेंद्र याने हा व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करणे सुरु केले होते. सोनिया हीने तिच्या पतीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर राहुल आणि दीपेंद्र यांच्या शाब्दीक बाचाबाची झाली नंतर गोष्ट हाणामारीवर येऊन दीपेंद्र याच्या हत्येपर्यंत हे प्रकरण पोहचले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *