Tukaram Mundhe: आषाढी यात्रेवरही तुकाराम मुंढेंचं लक्ष; वारकऱ्यांना स्वच्छ अन् चांगले अन्नपदार्थ मिळावे, पालकमंत्री फोन करणार


सोलापूर : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या चांगलच चर्चेत असून आयुक्त तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विधिमंडळ अधिवेशनातही मुंढेंच्या कामाचा धडाका आणि कार्यवाहीचे कौतुक करतण्यात आले आहे. त्यातच, यंदाच्या आषाढी (Ashadhi)वारी यात्रा उत्सवातही तुकाराम मुंढे यांचा इफेक्ट दिसणार असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तसे संकेत दिले आहेत. आषाढी वारीच्या तयारी संदर्भात आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची बैठक पंढरपूर (Pandhapur) येथे पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी तुकाराम मुंढेंचा उल्लेख केला. आपण तुकाराम मुंडे यांच्याशी बोलणार असून आषाढी यात्रेत भाविकांना चांगले अन्नपदार्थ मिळावेत, अशा सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेच्या तयारीमध्ये पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरात आषाढी यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना चांगले आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आले आहेत. याबाबत मी तुकाराम मुंढेंना बोलणार आहे, असे देखील गोरेंनी म्हटले. दरम्यान, कालच बुलढाण्यातली शेगाव येथे अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून मंदिर परिसरातील पेढ्याच्या दुकानातून नमुने जप्त केले आहेत.

आषाढी यात्रा काळात भाविकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने 5000 एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या असून यावर्षी चांगल्यात चांगली सुविधा देण्याची कबुली परिवहन विभागाने दिल्याचे गोरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या पालखी मार्गाची नव्याने निर्मिती झाल्यामुळे अनेक निवाऱ्याची झाडे रस्त्याच्या कामात पाडण्यात आली होती. यावर्षी जिल्हा परिषदेच्या कडून 10 हजार झाडे पालखी मार्गावर लावण्याचा निर्णय झाल्याची माहिती गोरे यांनी दिली. 

पाण्यासाठी मुख्यमंत्र्‍यांना पत्र

जयकुमार गोरेंनी आज पंढरपुरात येऊन पालखी मार्गासह चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसरसह सर्व भागांची पाहणी केली. या पाहणीनंतर चंद्रभागेत पाणी सोडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. आषाढी वारीमध्ये लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. मात्र, यंदा अलनिनोचे संकट असल्यामुळे पाण्यावर जरी निर्बंध असले. तरी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी चंद्रभागा अर्थात भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. जेणेकरून लाखो वारकरी भक्तांची व्यवस्था होईल. राज्यात जरी पाणीटंचाई असली तरी पालखी मार्गावर पाण्याची कमतरता नाही, असेही जयकुमार गोरे यांनी म्हटले. 

पंढरपुरात पावसाचे आगमन

पंढरपुरात आज मेघराजाने दर्शन दिले असून दुपापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला बळीराजा मात्र सुखावलेला आहे. या मान्सूनमध्ये पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावली असून सकाळपासूनच पाऊस पडेल असा अंदाज होता. त्यानुसार दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर, विठ्ठल मंदिर परिसरात काही काळ भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात कवड्याची माळ, हाती भवानी तलवार; धाराशिवमधून ठाकरेंचा ओमराजेंना म्हणाले, हा ‘गद्दार’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *