IND vs IRE 2nd T20 : भारताची टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी हाराकिरी! श्रेयसच्या नेतृत्त्वाखाली आयर्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत पराभव, दुसऱ्या टी-20 मध्ये 1 धावेने घात


Ireland vs India, 2nd T20I : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सर्वात मोठा आणि लाजिरवाणा धक्का आज क्रिकेट चाहत्यांना बसला आहे. टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला आयर्लंडसारख्या नवख्या संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 1 धावेने पराभूत केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची ही आजवरची सर्वात मोठी ‘हाराकिरी’ मानली जात आहे. या थरारक विजयासह आयर्लंडने दोन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 अशी जिंकून इतिहास रचला आहे. भारतावर आयर्लंडचा हा पहिलाच मालिका विजय आहे.

आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

आयर्लंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सुवर्णक्षण ठरला आहे. यापूर्वी त्यांनी भारताला कधीही टी-20 मालिकेत पराभूत केले नव्हते. मात्र, मायदेशात खेळताना आयर्लंडच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दाखवलेला संयम आणि आक्रमकता थक्क करणारी होती. विशेषतः दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजीला खिंडार पाडत त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अशक्य वाटणारा विजय खेचून आणला.

पहिल्याच षटकात भारताचे दोन्ही सलामीवीर OUT

आयर्लंडच्या 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. जय मुंद्राने पहिल्याच षटकात भारताचे दोन्ही सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांना बाद केले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्मालाही शून्यावर बाद केले.

त्यानंतर जय मुंद्राने कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस 7 चेंडूंमध्ये 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर इशान किशन 11 चेंडूंमध्ये 12 धावा करून धावबाद झाला. अशाप्रकारे, भारतीय संघाने 4.5 षटकांत 34 धावांवर चार महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यानंतर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी पाचव्या विकेटसाठी एक छोटी भागीदारी केली, पण अक्षर पटेल मॅथ्यू हॉलार्डच्या गोलंदाजीवर बाद झाला. अक्षर पटेलने 18 चेंडूंमध्ये 14 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबेच्या रूपाने भारताने आपली सहावी विकेट गमावली. मॅथ्यू हम्फ्रीजने दुबेला 16 चेंडूंमध्ये 20 धावांवर बाद केले.

भारतीय संघाने 121 धावांवर तीन विकेट गमावल्या. दुबेच्या पाठोपाठ तिलक वर्मा आणि सूर्यांशही पॅव्हेलियनमध्ये परतले. तिलक वर्माने 46 चेंडूंमध्ये 55 धावा केल्या, तर सूर्यांश 5 चेंडूंमध्ये 1 धाव काढून बाद झाला. 

हॅरी टेक्टरची वादळी खेळी

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 8 गडी गमावून 154 धावा केल्या. आयर्लंडकडून हॅरी टेक्टरने 56 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली, तर बेंजामिन कॅलिट्झने 37 धावांचे योगदान दिले. प्रिन्स यादवने भारतीय संघासाठी तीन बळी घेतले, तर शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

हे ही वाचा –

IND vs IRE 2nd T20 : खातं उघडण्यापूर्वीच दांड्या गुल! अभिषेक अन् संजूच्या शून्यावर OUT, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा घडली ही भयानक घटना, कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा नापास





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *