Sushma Andhare on Sanjay Dina Patil: ‘माणूस जितका हिंसक होतो, तितकाच तो आतून घाबरलेला असतो’, संजय दिना पाटलांच्या शिवीगाळ प्रकरणावर सुषमा अंधारे कडाडल्या


Sushma Andhare on Sanjay Dina Patil: ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळ आणि गैरवर्तनाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात तीव्रतेने उमटत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena UBT) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

Sushma Andhare on Sanjay Dina Patil: घाबरलेला माणूसच हिंसक होतो; सुषमा अंधारेंचा टोला

पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या संजय दिना पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “पत्रकारांच्या सुरक्षेविषयी आम्ही कोणाला विचारायचं? संजय दिना पाटील यांनी जे काही केलंय, त्याला हिंमत म्हणत नाहीत, ते आतून कमालीचे घाबरले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो, तितकाच तो आतून घाबरलेला असतो. संजय दिना पाटील यांना तिप्पट पैसे कंटेनरने मिळाले असतील, पण संजय दिनांचा नैतिक जनाधार ढासळला आहे. उद्धव साहेब भांडूपमध्ये गेले, तेव्हा लोक ज्या उत्स्फूर्तपणे रस्त्यावर गेले होते, त्यामधून कळालं आहे.”

Sushma Andhare on Sanjay Dina Patil: मानसिक संतुलन ढासळल्यास जबाबदारी सरकारने घ्यावी

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, “घाबरलेले संजय दिना पाटील मानसिक संतुलन ढासळल्यासारखे करत असतील तर याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्याचा भुर्दंड पत्रकारांनी का भरावा? सध्या अधिवेशन सुरू आहे. भास्कर जाधवांनी सभागृहात प्रश्न विचारला, यावर उत्तर येईपर्यंत सभागृहात पुढचं कामकाज झालं नाही पाहिजे,” असे त्यांनी म्हटले. 

Sushma Andhare on Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागली तोफ

खासदार संजय दिना पाटील यांनी ‘यापूर्वी 5 लोकांना मारले आहे’ असे जे विधान केले होते, त्या विधानाचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या म्हणाल्या की, “संजय दिना पाटील 5 लोकांना मारलं असं म्हणतात, याचा अर्थ गृहखात्याचा वचकच नाही. देवेंद्र फडणवीस अपयशी गृहमंत्री आहेत, हे कितीवेळा अधोरेखित होत आहे. खासदार सांगतायत मी पाच जणांना मारलं, त्यांना कसं मारलं? यावर प्रश्न विचारले पाहिजेत. जो माणूस शिंदेंकडे जातो, तेव्हा नैतिकता आणि विवेक हरवून बसतो,” असा घणाघात देखील त्यांनी केलाय.

Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना संजय दिना पाटील यांनी, ‘माझ्या वाट्याला जाणाऱ्यांना मी एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवेन नाहीतर स्मशानात पाठवेन. आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी पाच लोकांचे खून पाडलेत’, अशी फुशारकी मारली होती. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणावर आणि त्यांची मुलगी व ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत संजय दिना पाटील यांनी अत्यंत गैरवर्तन केले. 

प्रसारमाध्यमांवर संतापत संजय दिना पाटील म्हणाले की, “तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारून पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा. तुम्ही माईक माझ्या तोंडासमोर कशाला धरता, आता तुम्ही तिकडे जाऊन आलात ना, मग इकडे येता, कशाला हे सगळं करताय? मी जे बोललोय ते खुलेआम बोललोय, माझ्यावर काय कारवाई करायची असेल तरी पोलीस करतील, मी कारवाई आणि चौकशीला तयार आहे,” असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Aaditya Thackeray on Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना ‘मारून टाकेन’ची धमकी; आता आदित्य ठाकरेंचं मग्रूर खासदाराला खुलं आव्हान; म्हणाले, ‘तुमच्यात हिंमत अन् लाज असेल तर…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *