व्यावसायिक LPG सिलेंडर वापरणाऱ्यांना दिलासा! सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, होईल फायदा | बिझनेस


Last Updated:

एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारने कमर्शियल लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी सप्लायला पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एलपीजी
एलपीजी

नवी दिल्ली : पश्चिम आशियात तणाव सुरू होता. ज्यामुळे एलपीजी पुरवठ्यात अडचडणी निर्माण झाल्या होत्या. आता केंद्र सरकारने कमर्शियल LPG पुरवठ्यावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतलाय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र जारी केलंय.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना एक पत्र पाठवलंय. यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक कॅस मंत्रालयाने नॉन-डोमेस्टिक पॅक्ड एलपीजीच्या पुरवठ्यावरील सर्व निर्बंधन हटवण्याची घोषणा केलीये. पुरवठ्याच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर व्यावसायिक एलपीजीची उपलब्धताही सामान्य करणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

मंत्रालयानुसार, कमशियल-पॅक्ड एलपीजीचा पुरवठा हा घरगुती गॅस वापरणाऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय पुरवठा होत राहावा म्हणून कमी करण्यात आला होता. मात्र आता हा पुरवठा पुर्ववत करण्यात आलाय. मंत्रालयाने बल्क LPG पुरवठ्यावर लादलेले निर्बंधही शिथिल केले आहेत.

पत्रात लिहिलंय की, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल उपभोक्तांचा डेटा ऑइल मार्केटिंग कंपन्यांद्वारे जमा आणि मेंटेन केला जातो. मॉनिटरिंग आणि सप्लाय मॅनेजमेंटला सुधारण्यासाठी तीन पब्लिक सेक्टर OMCs मध्ये एक यूनिफाइड डेटाबेसही तयार केला जाऊ शकतो.

PNG वापरण्याचा आवाहन 

यासह केंद्र सरकारने पाइप्ड नॅच्युरल गॅस स्वीकारा असं आवाहन केलंय. अनेक कमर्शियल आणि बल्क उपभोक्ता आधीच PNG वर शिफ्ट झाले आहेत. त्यांना याच इंधनाचा वापर सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. मंत्रालयाने पुढे निर्देश दिला की, ज्या LPG उपभोक्तांजवळ PNG नेटवर्कची सुविधा आहे. तसंच जे कनेक्शन घेण्याची प्रोसेस करत आहेत. त्यांनी PNG वर शिफ्ट व्हायला हवं.

मंत्रालयाने म्हटलंय की, OMCs आणि  सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन कंपन्या योग्य उपभोक्त्यांना PNG वर शिफ्ट करण्याची प्रोसेस जारी ठेवण्यासाठी मिळून काम करतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाला नियमित प्रोग्रेस रिपोर्ट सोपवण्यासाठी एक रिपोर्टिंग सिस्टमही बनवली जाईल.

या लोकांना होईल फायदा 

या निर्णयाने हॉटेल, रेस्तरॉ, इंडस्ट्रियल यूनिट्स आणि इतर कमर्शियल प्रतिष्टांनांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या लोकांना पश्चिम आशियामध्ये वाढलेल्या जियोपॉलिटिकल तणावादरम्यान सप्लायच्या अडचणींचा सामना करावा लागला होता.

मराठी बातम्या/मनी/

व्यावसायिक LPG सिलेंडर वापरणाऱ्यांना दिलासा! सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय, होईल फायदा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *