Zee Marathi: टीआरपीच्या रणांगणात झी मराठीने उतरवले 'हे' नवे ब्लॉकबस्टर! नाव पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

Zee Marathi: महाराष्ट्रात  मान्सूनच्या आगमनसोबत झी मराठी वरही नवीन मनोरंजनाचं आगमन होणार आहे. आता संध्याकाळी गरमागरम चहा, कुरकुरीत भजी, हातात रिमोट आणि टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा सर्वात लाडका कार्यक्रम पाहण्याचा आनंद मिळणार आहे. अशा दुहेरी आनंदाची पर्वणी आता महाराष्ट्राच्या घराघरात रंगणार आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवलेला आणि दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा ‘होम मिनिस्टर’ पुन्हा नव्या पर्वासह भेटीला येत आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार तोच लाडका आवाज  ’दार उघड बये, दार उघड…! कारण  आदेश बांदेकर म्हणजेच “भाऊजी पैठणी घेऊन आले…” . असंख्य कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले ‘भाऊजी’ आता पुन्हा एकदा वहिनींच्या भेटीस सज्ज झाले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या पुनरागमनाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हे दोन सुपरहिट शोज होणार पुन्हा सुरु

याचसोबत मराठी संगीतविश्वातील सर्वात लोकप्रिय मंच ‘सा रे ग म प’ देखील नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक गुणी गायकांना व्यासपीठ देणाऱ्या या कार्यक्रमाने वर्षानुवर्षे रसिकांची मने जिंकली आहेत. या नव्या पर्वातून नव्या सुरांचा, नव्या प्रतिभांचा आणि अविस्मरणीय संगीतप्रवासाचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. या पर्वात अवधूत गुप्ते यांची दमदार उपस्थिती पुन्हा एकदा संगीतप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्या खास शैलीतील मार्गदर्शन, उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि संगीतावरील प्रेमामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच ऊर्जा लाभणार आहे.‘होम मिनिस्टर’ आणि ‘सा रे ग म प’ या दोन सुपरहिट कार्यक्रमांच्या पुनरागमनासह आदेश बांदेकर आणि अवधूत गुप्ते हे दोन लाडके चेहरे पुन्हा झी मराठीच्या मंचावर झळकणार आहेत.

’होम मिनीस्टर’ या सदाबहार कार्यक्रमाचा दुसरा पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दुसऱ्या पर्वाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.  या शोमधून आदेश बांदेकर पुन्हा एकदा दमदार कमबॅक करणार आहेत.  प्रोमोमध्ये आदेश बांदेकर ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत एका साडीच्या दुकानात जातात. तिथे जाऊन आदेश बांदेकर पैठणी निवडतात. बऱ्याच पैठणी सिलेक्ट करुन त्या पॅक करायला सांगतात.  ’माझी तर तयारी झाली आहे, वहिनी लवकरच येतोय तुमच्या घरी…’, असं आदेश भावोजी म्हणतात.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *