Video: काल जोर का झटका दिलाय, संतुलन बिघडलंय त्यांचं, विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल


मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं असून आज दुसऱ्या दिवशीचही विरोधकांनी सत्ताधारी पक्षाचे नेते, मंत्री यांच्या कामकाजावर आक्षेप घेत सभात्याग केला. खात्याचे मंत्री उत्तरच देत नाहीत, असे आरोप करत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. आज आम्ही सभागृहावर बहिष्कार टाकला,एक नवीन प्रकार मिंदे सरकारच्या काळात सुरू झाला. ⁠हे मिंदे स्वतःच्या खात्याचा अभ्यास करत नाही, ⁠उत्तर देता येत नाही म्हणून दुसऱ्या मंत्र्यांवर जबाबदारी देतात, अशा शब्दा एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला सभागृहातून उत्तर दिले.  

फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळून जातात. ⁠आमच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी पळ काढला नाही की जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही. ⁠जी खाती रडून घेतली त्याबाबत उत्तर द्यायला हवीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, अध्यक्ष हे खोटं बोलले ते रेकॉर्डवर गेलं आहे, हे रेकॉर्डवरून काढावं, असे आदित्य यांनी म्हटले. तर, जितेंद्र आव्हाड यांनीही आदित्य ठाकरेंची बाजू घेतली. 

आणखी झटके देणार – शिंदे

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी सभागहातूनच उत्तर दिले. सभागृहाचे कामकाज अध्यक्ष तुमच्या आध्यक्षतेखाली चालते, काल जोर का झटका दिल्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी आणखी ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच, विजयराव, जयंतराव तुम्ही ज्येष्ठ आहात, काय पोरा टोरांचे ऐकता, असे म्हणत आदित्य यांना डिवचलं. तसेच, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. 

अध्यक्ष आम्हाला मूर्ख समजतात

जितेंद्र आव्हाड यांनी आदित्य ठाकरेंची बाजू घेत भूमिका मांडली. अध्यक्ष काहीही इंग्रजी शब्द वापरून आम्हाला मूर्ख समजतात, ⁠आम्हीही चांगल्या शाळेत शिकलो आहोत. ⁠आम्हाला इंग्रजी कळतंय आमचा बाप जरी गावी कुठे जन्माला आला असेल, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांवर जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला. ⁠आता त्यांनी वापरलेले शब्द शशी थरूर यांना पाठवतो, ⁠हातात कायदा आहे म्हणून सभागृह कसेही चालवायचे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  

हेही वाचा

संजय दिना पाटलांनी मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला होता, राजीनाम्याची धमकी दिली; संजय राऊतांचा पलटवार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *