Sanjay Raut and Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांनी मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला होता, राजीनाम्याची धमकी दिली; संजय राऊतांचा पलटवार


Sanjay Raut and Sanjay Dina Patil: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी पक्षप्रवेशानंतर आपल्या विरोधकांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. माझ्या नादाला लागाल तर एक तर हॉस्पिटलमध्ये जावे लागेल नाही तर स्मशानात. माझ्या वडिलांच्या वेळी असाच प्रसंग घडला होता. त्यावेळी आम्ही पाच जणांना मारलं होतं. आम्हाला पोलिसांच्या सुरक्षेची गरज नाही. आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, असे सांगत संजय दिना पाटील यांनी बंदुकीची ॲक्शन करत ‘ऑपरेशन तुडवा’च्या तयारीत असलेल्या आपल्या विरोधकांना इशारा दिला होता. याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय दिना पाटील यांच्यावर पलटवार गेला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics news)

संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांना तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “चल मी तुझ्या नादाला लागतो. बंदुका वगैरे आम्हाला दाखवू नको. मी इथेच भांडूपला आहे, बंदूक काय दाखवतो सा#, शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस. गद्दारी केले 50 कोटी गिळलेत ना, मग गप्प बसायचं, बंदुकीची भाषा करायची नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय दिना पाटील यांना पक्षातील कोणत्या नेत्याविषयी तक्रार होती, त्यांनी मातोश्रीवर येऊन सांगायला हवे होते. तो कोण नेता हे मला माहिती नाही. आता त्यांनी पक्ष सोडला, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Dina Patil: संजय दिना पाटील यांनी मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा केला: संजय राऊत

संजय दिना पाटील यांनी काल पक्षप्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, “मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदारकी किंवा खासदारकीसाठी कधीच गेलो नाही. त्यांनीच मातोश्रीवर बोलावून मला तिकीट दिले. माझ्या मुलीसाठीही मी तिकीट मागितले नव्हते. ती जागा मनसेला जाऊ नये म्हणून माझ्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधण्यात आला”, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले होते. संजय दिना पाटील यांचा हा आरोप संजय राऊत यांनी खोडून काढला. त्यांनी म्हटले की, मिंधे गटात गेल्यावर संजय दिना पाटील हे खोटे बोलत आहेत. संजय दिना पाटील यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आपली मुलगी राजुल पाटील हिला उमदेवारी मिळावी, यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मुलीच्या उमेदवारीसाठी संजय दिना पाटील यांनी खूप तमाशा घातला होता.  मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो, असे बोलण्यापर्यंत संजय पाटील यांची मजल गेली होती. हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर संजय दिना पाटील उमेदवारी अर्ज मागे घ्यायलाही गेले होते, कारण कार्यकर्ते काम करणार नाहीत, असे त्यांना वाटले होते. त्यामुळे संजय दिना पाटील यांची आता खोटे बोलणे थांबवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

आणखी वाचा

Sanjay Dina Patil Operation Tiger: शिंदे गटात जाताच संजय दिना पाटील आक्रमक; बंदुकीची ॲक्शन करत म्हणाले, माझ्या नादाला लागलात तर हॉस्पिटलमध्ये जाल नाहीतर स्मशानात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *