Riteish Deshmukh Angry on Salman Sanjay Lockup Question:मराठी मनोरंजनसृष्टीत ‘राजा शिवाजी’ सारखा चित्रपट दिल्यानंतर आता अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी कारण आहे, त्याच्या नव्या शोचं. रितेश देशमुख आणि फराह खान होस्ट करत असलेल्या लॉक अप: सच की सजा’च्या दुसऱ्या सीझनचा भव्य लाँच नुकताच पार पडला. नेटफ्लिक्सवर प्रीमियर होण्याआधीच या शोची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, लाँचदरम्यान झालेल्या एका प्रश्नोत्तर सत्रात रितेश देशमुख एका पत्रकाराच्या प्रश्नावर संतापलेला दिसला. याची सध्या मनोरंजनसृष्टीत एकच चर्चा रंगली आहे. संजय दत्त आणि सलमान खानच्या लॉक अपच्या अनुभवावरून हा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.
नेमकं झालं काय?
कार्यक्रमात एका पत्रकाराने रितेशला विचारलं, “सलमान खान आणि संजय दत्त हे तुमचे जवळचे मित्र आहेत. त्यांना लॉकअपचा अनुभवही आहे. मग तुम्ही त्यांना नेटफ्लिक्सच्या ‘लॉक अप’मध्ये आणाल का? आणि त्यांना कशी शिक्षा द्याल?” हा प्रश्न रितेशला अजिबात पसंत पडला नाही. त्यावर त्याने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं, “सर्वात आधी मला वाटत नाही की तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन मी त्याला काही प्रतिष्ठा द्यायला हवी. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं” असंही रितेशने स्पष्ट सांगितलं. तरीही त्याला पुन्हा विचारण्यात आलं की, सलमान आणि संजयला शोमध्ये बोलवण्याची इच्छा आहे का? त्यावर रितेशने ठामपणे सांगितलं, “मी त्यांना आणणार नाही. माझं काम फक्त होस्टिंग करणं आहे. शोमध्ये कोण सहभागी होणार, हे मला माहीत नसतं. ‘लॉक अप’मध्ये जे गेस्ट येतात, त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो.” असं रितेश म्हणाला.
यावेळी नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल देखील उपस्थित होत्या. त्यांनी गंमतीशीर अंदाजात म्हटलं,“जर कधी तुरुंगात जावं लागलं, तर फराह खान आणि रितेश देशमुखसारखे मनोरंजक जेलर दुसरे कुठे मिळणार नाहीत. फराहपासून काहीही लपवणं अशक्य आहे, आणि रितेश तुम्हाला हसवत हसवत तुमची क्लास घेईल.” दरम्यान, ‘लॉक अप: सच या सजा’चा नवा सीझन येत्या 27 जून 2026 पासून Netflix वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोच्या नव्या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार, याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
नेमका काय आहे हा शो?
Netflix वरचा हा एक दमदार आणि वेगळ्या धाटणीचा रिअॅलिटी शो आहे. यात ज्या व्यक्तींना आपण ओळखतो असं वाटतं, ते जेंव्हा स्वतःचं खरं रूप दाखवायला भाग पाडलं जातं. त्यानंतर नेमकं काय घडतं? हे दाखवणारी या शोची थीम आहे. Netflix आणि बालाजी टेलीफिल्मस यांची ही संयुक्त निर्मिती असलेल्या या शोमध्ये जागतिक प्रेक्षकांना खेचून आणण्यासाठी भव्य सेट डिझाइन, गुंतागुंतीचा गेमप्ले, भावनिक प्रेशर आणि प्रत्येक क्षणी अनपेक्षित घडामोडी घडवून आणल्या जातात. या शोमध्ये रितेश देशमुख आणि फराह खान ‘जेलर’च्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली 14 प्रसिद्ध सेलिब्रिटी ‘कैदी’ म्हणून एका तुरुंगासारख्या वातावरणात राहणार आहेत. भारतीय रिअॅलिटी मनोरंजन क्षेत्रात याआधी असा प्रयोग पाहायला मिळालेला नाही. मात्र हा शो फक्त तुरुंगातून टिकून राहण्याचा खेळ नाही. यात प्रतिमा जपणे, कबुलीजबाब आणि सत्य यावर फोकस असेल.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष