Bhootam Bhayam Reelstar: आपल्या भन्नाट कॉमिक टाइमिंगने करोडो प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय ‘ऑरेंज ज्यूस गँग’ आता पहिल्यांदाच केवळ डिजिटल विश्वापुरती मर्यादित न राहाता, एका मोठ्या पडद्यावरील भव्य सिनेमात मुख्य भूमिकेत धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आगामी ‘भूतम भयम्’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट येत्या 24 जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘भूतम भयम्’ हा चित्रपट तांत्रिक आणि कलात्मकदृष्ट्या अत्यंत दर्जेदार पद्धतीने बनवण्यात आला आहे. मराठी चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळणारी भव्य दृश्यरचना, अचूक विनोद आणि उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स यांचा एक अनोखा सिनेमाटोग्राफिक संगम या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असून यात रहस्यमय घटनांमध्ये अडकलेल्या सात बेरोजगार मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटाची कथा जितकी मनोरंजक तितकीच ऑरेंज ज्युस गँगमधील या मित्रांची रिअल लाईफ स्टोरीही प्रेरणादायी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले हे मित्र सुरुवातीच्या काळात एका छोट्या खोलीत एकत्र येऊन, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी छोटे व्हिडिओ रिल्स बनवायचे आणि त्यातूनच त्यांचा पुढील प्रवास सुरु झाला.
रिलस्टार आता सिनेमात झळकणार (Bhootam Bhayam Reelstar Movie)
त्यामुळे आता या भव्य स्केलवर काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना नील साळेकर म्हणाला, “झी स्टुडिओजसारख्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटात आणि थिएटर्सच्या मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत येणे हा आमच्यासाठी खूप मोठा क्षण आहे. ‘भूतम भयम्’ हा चित्रपट एका मोठ्या स्केलवर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शूट केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना एकाच वेळी घाबरवणार आणि खळखळून हसवणार देखील आहे. चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर आणि उत्तम साऊंड सिस्टीमवरच अनुभवण्यासारखा हा सिनेमा आहे.”
तर करण सोनावणे म्हणाला की, “लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्हाला खूप प्रेम दिले आहे, परंतु सिनेमाचे माध्यम पूर्णपणे वेगळे आहे. ‘भूतम भयम्’साठी आम्ही कॅमेरा फेस करताना आमचे सोशल मीडिया स्टारडम संपूर्णपणे बाजूला ठेवले होते. तिथे आम्ही फक्त एक कलाकार म्हणून स्वतःला झोकून दिले. आम्हा सर्व मित्रांसाठी एकत्र एकाच वेळी मोठ्या पडद्यावर येणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे.”
या चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँगमधील करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि शुभम जाधव यांच्यासोबतच मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटात अभिनयाची आणि मनोरंजनाची एक तगडी जुगलबंदीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले असून, नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे निर्माते आहेत तर बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. टाईमपास, सस्पेन्स आणि भितीचा एक जबरदस्त ‘सिनेमॅटिक एक्सपिरीयन्स’ असलेला हा चित्रपट २४ जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष